Varisu First Look Out : थलापती विजयच्या आगामी 'वरिसु' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज
Thalapathy Vijay : थलापती विजयचा आगामी 'वरिसु' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Varisu First Look Out : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थलापती विजयचा (Thalapathy Vijay) 'वरिसु' (Varisu) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच थलापती विजयने या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. थलापती विजयचा नुकताच 'बीस्ट' (Beast) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली नव्हती. पण 'वरिसु' सिनेमा मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असे म्हटले जात आहे.
थलापती विजयच्या 'वरिसु' सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट
थलापती विजयच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला 'वरिसु'च्या निर्मात्यांनी या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट केला आहे. त्यामुळे थलापतीसह त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. विजय त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये विजयचा फॉर्मल लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सिनेमाच्या पोस्टरवर 'वरिसु - द बॉस रिटर्न्स' असे लिहिलेलं आहे.
View this post on Instagram
थलापती विजय आणि रश्मिका मंदानाची जोडी प्रेक्षकांना दिसणार
'वरिसु' या सिनेमात प्रेक्षकांना थलापती विजय आणि रश्मिका मंदानाची जोडी पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे शूटिंग अद्याप पूर्ण झालेलं नाही. सिनेमात विजय आणि रश्मिका व्यतिरिक्त प्रभू, सरथ कुमार, प्रकाश राज, जयसुधा, श्रीकांत, शाम, योगी बाबू, संगीता आणि संयुक्तादेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
2023 च्या पोंगलमध्ये सिनेमा होणार प्रदर्शित
'वरिसु' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा वामशी पेडिपल्ली सांभाळत आहेत. तर या सिनेमाची कथा वामशी पेडिपल्ली यांच्यासह लेखक हरी आणि आशिशोर यांनी लिहिली आहे. हा बिग बजेट सिनेमा आहे. हा भव्यदिव्य सिनेमा 2023 च्या पोंगलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या