Beast: शहारूख थलापती विजयचा जबरा फॅन; बीस्टचा ट्रेलर पाहिल्यानंतर म्हणाला...
बीस्ट (Beast) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh khan)नं पाहिला.
Beast : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेचा थलापती विजयचा (Thalapathy Vijay) बीस्ट (Beast) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर 4 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटामध्ये थलापती विजयबरोबरच पूजा हेगडे, सेल्वाराघवन, शाईन टॉम चाको, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश आणि रॅडिन किंग्सले हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh khan)नं पाहिला. ट्रेलर पाहिल्यानंतर शाहरूखनं ट्वीट शेअर करून चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
शाहरूखचं ट्वीट
शाहरूखनं ट्वीट शेअर करून लिहिले, 'मी दिग्दर्शक एटलीसोबत बसून बीस्टचा ट्रेलर पाहिला. ते देखील माझ्यासारखेच विजयचे फॅन आहेत. बीस्टच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. हा ट्रेलर मीनर, लीनर आणि स्ट्रॉन्गर दिसत आहे. '
Sitting with @Atlee_dir who is as big a fan of @actorvijay as I am. Wishing the best for beast to the whole team…trailer looks meaner…. Leaner… stronger!!https://t.co/dV0LUkh4fI
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 5, 2022
रिपोर्टनुसार हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये 600 ते 700 स्क्रिन्सवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 13 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरूखच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
- Sher Shivraj : अंगावर शहारे आणणाऱ्या 'शेर शिवराज'चे नवे पोस्टर प्रदर्शित
- Shehnaaz Gill : शहनाज गिलच्या आठवणीत अजूनही सिद्धार्थ, वॉलपेपरवरही तोच...
- Tejasswi Prakash : तेजस्वीनं घेतली आलिशान गाडी; शोरूममध्ये केली पूजा, किंमत माहितीये?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha