Thalaivi Trailer Release : कंगना रनौतचा चित्रपट थलाईवी'चा ट्रेलर रिलीज, सोशल मीडियावर धुमाकूळ
कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आगामी तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता (Jayalalithaa) यांच्या जीवनावर आधारीत थलाईवी (Thalaivi या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर अभिनेत्रीचे कौतुक करीत आहेत.

जयललिता यांचा बायोपिक ' थलाईवी'चा ट्रेलर आज रिलीज झाला असून यामध्ये कंगनाचा हटके अंदाज दिसून येत आहे. कंगनाच्या वाढदिवसानिमित्ताने ट्रेलर रिलीज करुन अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे.
तीन मिनिटे 22 सेकंदचा हा ट्रेलर असून जयललिता यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण आणि त्यानंतर अभिनेत्री म्हणून नावाजणं, तसेच देशातील सर्वात प्रभावी राजकारणी म्हणून ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. ट्रेलरची सुरुवातच दमदार डायलॉग्सने झाली आहे. कंगनाने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असून जयललिता यांच्यासारखे दिसण्यासाठी 20 किलो वजनही वाढवले आहे.
थलाईवी चित्रपट येत्या 23 एप्रिल 2021 प्रदर्षित होणार आहे. अरविंद स्वामी या चित्रपटात एमजी आरची भूमिका साकारणार आहेत. हा चरित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शक ए.एल. विजय आहेत तर विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















