(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Telly Masala : अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा शूटींगदरम्यान अपघात ते नव्या मालिकांचा 'प्रवाह' सुरुच, पण प्रेक्षक म्हणतायत, हा तर रिमेक...; जाणून घ्या मनोरंजन सृष्टीसंदर्भात महत्वाच्या बातम्या
Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Nishigandha Wad : अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा शूटींगदरम्यान अपघात, पायाला दुखापत; रुग्णालयात केलं दाखल
आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री निशिगंधा वाड ( Nishigandha Wad) यांच्यासंदर्भात एक मोठी अपडेट सध्या समोर येत आहे. मालिकेच्या सेटवर शूटींगदरम्यान निशिगंधा वाड यांचा अपघात झाला आहे. निशिगंधा यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Tu hi re Maza Mitva: नव्या मालिकांचा 'प्रवाह' सुरुच, पण प्रेक्षक म्हणतायत, हा तर रिमेक... ; सोशल मीडियावरील प्रोमोने वेधलं लक्ष
सध्या टीआरपीच्या रेसमध्ये आपल्या चॅनलचे स्थान अव्वल ठेवण्यासाठी छोट्या पडद्यावर नव्या मालिकांचा धडाका सुरू झालाय. सध्या स्टार प्रवाह वर नव्या मालिकांची रांग लागल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेची घोषणा झाली. त्यानंतर 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेचे प्रोमोही येण्यास सुरुवात झाली. आता या वाहिनीवर आणखी एक मालिका दाखल होणार आहे. नुकतीच या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Sharad Pawar : 35-40 हजारांची गर्दी, साडेपाचची सभा,मुसळधार पाऊस अन्... मराठी अभिनेत्याने सांगितला शरद पवारांच्या 'साताऱ्यातील' सभेचा किस्सा
महाराष्ट्राच्या 2019च्या निवडणुकांमध्ये साताऱ्यात शरद पवारांच्या (Sharad Pawar) एका सभेने पुढच्या पाच वर्षांची राजकीय गणितच बदलून टाकल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शरद पवारांच्या सभेतील पाऊस हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. शुक्रवारी साताऱ्यातील रहिमतपूरमध्ये पार पडलेल्या सभेचीही पावसामुळे चर्चा झालीच, पण या सभेतील शरद पवारांचं भाषण विशेष गाजलं. याच सगळ्यावर अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
4 वर्षांनी मायदेशी परतली, छोट्या पडद्यावर दमदार कमबॅकही केलं, आता या अभिनेत्रीनं केलं व्यवसायात पदार्पण
Mrunal Dusanis: मराठी मनोरंजनसृष्टीपासून गेली काही वर्ष लांब असलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस आता जोमाने कामाला लागली आहे. छोटा पडदा गाजवणाऱ्या मृणालनं भारतात परतल्यावर चाहत्यांना मालिकेत पदार्पण करत सुखद धक्का दिल्यानंतर आता आणखी एक सरप्राईज देणार असल्याचं तिनं सांगितलंय. तिनं नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक सरप्राईज दिलं आहे. अभिनयासोबतच ती आता नवीन व्यवसायही करणार आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Rajan Vichare: धर्मवीर सिनेमातला 'तो' सीन अन् राजन विचारेंचा मोठा खुलासा, म्हणाले, मीच दिघे साहेबांना सांगितलं...
Rajan Vichare on Dharmaveer Scene: मराठी मनोरंजनविश्वात धर्मवीर या चित्रपटानं चांगलंच नाव काढलं. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एका सीनवर शिवसेनेच्या राजन विचारे यांनी मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सीनमध्ये शिवसेनेचे नेते आनंद दिघे राजन विचारे यांना सभापतीपदाचा राजीनामा द्यायला सांगतात असं दाखवण्यात आलं आहे. यावर सिनेमाच्या पलिकडं जाऊन नक्की काय झालं होतं हे सांगितलं. 'मीच अनंद दिघे साहेबांना तसं करण्याची कल्पना सुचवल्याचं त्यांनी सांगितलं.