एक्स्प्लोर

Rajan Vichare: धर्मवीर सिनेमातला 'तो' सीन अन् राजन विचारेंचा मोठा खुलासा, म्हणाले, मीच दिघे साहेबांना सांगितलं...

ते अशा परिस्थितीत असताना दिघे साहेंबांकडे मी स्वत:हून हा विषय काढला होता. असं म्हणत धर्मवीर चित्रपटातील एका सीनबद्दल राजन विचारे यांनी खुलासा केलाय.

Rajan Vichare on Dharmaveer Scene: मराठी मनोरंजनविश्वात धर्मवीर या चित्रपटानं चांगलंच नाव काढलं. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एका सीनवर शिवसेनेच्या राजन विचारे यांनी मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सीनमध्ये शिवसेनेचे नेते आनंद दिघे राजन विचारे यांना सभापतीपदाचा राजीनामा द्यायला सांगतात असं दाखवण्यात आलं आहे. यावर सिनेमाच्या पलिकडं जाऊन नक्की काय झालं होतं हे सांगितलं. 'मीच अनंद दिघे साहेबांना तसं करण्याची कल्पना सुचवल्याचं त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले राजन विचारे?

किरण माने यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राजन विचारे म्हणाले,'त्यावेळी नगरसेवक असणारे एकनाथ शिंदे यांची दोन मुलं मतदानादरम्यान झालेल्या एका दूर्घटनेत गेली. तो प्रत्येकाच्या जीवनात गंभीर प्रसंग होता. जेंव्हा आपल्या डोळ्यासमोर असा प्रसंग घडतो तेंव्हा कोणताही कुटुंबप्रमुख पुढचं कामच करू शकत नाही. ते अशा परिस्थितीत असताना दिघे साहेंबांकडे मी स्वत:हून हा विषय काढला होता. शिंदेंना दु:खातून बाहेर काढण्यासाठी त्यांना कुठलं पद दिलं तर ते दु:ख विसरण्यासाठी आणि समाजसेवेसाठी मदत होईल. तेव्हा साहेबांनी विचारलं कसं करता येईल? त्यावर चार वर्षांपासून मी सभागृहता म्हणून काम केलंय. जर त्यांना पद दिलं तर  लोकांसाठी समाजसेवा ते करतील' असं राजन विचारे यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajan Vichare (@mp_rajanvichare)

ठाणे मतदारसंघातून उभारले आहेत राजन विचारे

सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे राज्यात वाहत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा ठाणे मतदारसंघ भाजपकडे गेल्यानंतर यंदा ठाणे मतदारसंघात आता तिहेरी लढत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधानंतर भाजपने सलग तिसऱ्यांदा संजय केळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आलीये. मनसेकडून अविनाश जाधव उभे आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत धर्मवीर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या सीनविषयी ते बोलत होते.

धर्मवीर २ची स्टारकास्ट काय?

धर्मवीर २ चित्रपटात प्रसाद ओक या अभिनेत्याने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितिज दाते, तसेच स्नेहर तरडे, आनंद इंगळे, सुनिल तावडे यासारखी तगडी मराठमोळी स्टारकास्ट या सिनेमात दिसत आहे.  

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget