एक्स्प्लोर

Telly Masala : भाईजानला पुन्हा धमकी ते कलर्स मराठीची आणखी एक मालिका घेणार काहीच महिन्यांत निरोप? जाणून घ्या मनोरंजन सृष्टीसंदर्भात महत्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

सलमान खानमध्ये दम असेल तर... भाईजानला पुन्हा धमकी, त्यासोबतच 'ते' गाणं लिहिणाऱ्याला एका महिन्यात संपवण्याचा इशारा

Salman Khan Threat:  बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानला (Salman Khan) येणाऱ्या धमक्यांचं सत्र काही कमी होण्याचं नाव घेत नाही. सलमान खानला सातत्यानं जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. अशातच सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. बिश्नोई गँगकडून (Lawrence Bishnoi Gang) ही धमकी आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सातत्यानं येणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या आणि बिश्नोई गँगकडून करण्यात आलेली माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या या पार्श्वभूमीवर सलमान खानला मोठी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सलमान खानचं वांद्रे येथील घर, त्यानंतर तो जिथे जाईल ते शुटिंग डेस्टिनेशन किंवा सेट सगळीकडे पोलिसांचं मोठं वलय पाहायला मिळत आहे. अशातच सलमान खाननंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानलाही धमकी आल्याची माहिती मिळत आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

 'शेवटचे काही दिवस...', कलर्स मराठीची आणखी एक मालिका घेणार काहीच महिन्यांत निरोप? बिग बॉस फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Marathi Serial : कलर्स मराठी वाहिनीवर (Colors Marathi) लवकरच दोन नव्या मालिका सुरु होणार आहेत. 'अशोक मा.मा' आणि 'पिंगा गं पोरी पिंगा' या दोन नव्या मालिकांची घोषणा नुकतीच कलर्सवर करण्यात आली आहे. येत्या 25 नोव्हेंबरपासून या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतातय. त्यामुळे कोणत्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यातच आता बिग बॉस फेम अभिनेत्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली त्याची मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Star Pravah : 'आई कुठे काय करते'नंतर प्रेक्षकांना पुन्हा धक्का, स्टार प्रवाहवरील आणखी एक मालिका घेणार निरोप?

 स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका तब्बल पाच वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मालिकेविषयी बरीच चर्चा सुरु आहे. त्यातच आता स्टार प्रवाह वाहिनीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. ही मालिका देखील मागील तीन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?

 रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन' (Singham Again) थिएटरमध्ये दमदाक परफॉर्म करत आहे. मल्टी स्टारर चित्रपटात अजय देवगन (Ajay Devgn), टाइगर श्रॉफ (Tiger Shroff), अक्षय कुमार (Akshay Kumar), रणवीर सिंह (Ranveer Singh), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. अशातच दबंगमधील सलमान खानच्या चुलबूल पांडेच्या कॅमिओची विशेष चर्चा झाली. पण, चित्रपटाच्या कमाईवर तसा फारसा चांगला फरक दिसला नाही. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 7: 'भूल भुलैया 3'नं 'सिंघम अगेन'ला बॉक्स ऑफिसवर पाजलं पाणी; आता 200 कोटींपासून फक्त काही पावलं दूर

 दिवाळीच्या निमित्तानं बॉलिवूड फॅन्सना मनोरंजनाचा फराळ देण्यात आला. दिवाळीच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. एक रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' आणि दुसरा कार्तिक आर्यन अभिनित 'भूल भुलैया 3'. दोन्ही चित्रपटंची बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर झाली. विकेंडच्या दिवशी दोन्ही चित्रपटांनी मोठा गल्ला जमवला. पण विकडेजमध्ये कमाईत काहीशी घट पाहायला मिळाली. पण, अशातही मल्टीस्टारर 'सिंघम अगेन'ला कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3'नं मागे टाकत आपली घौडदौड सुरूच ठेवली आहे. 'भूल भुलैया 3' मध्ये रूह बाबा म्हणून कार्तिक आर्यननं आपलं वर्चस्व गाजवलं. तर कार्तिकला एक नाही, दोन मंजुलिकांनी दमदार साथ दिली. लोकांना हा चित्रपट इतका आवडला की, अजय देवगनच्या बिग बजेट आणि मल्टीस्टारर 'सिंघम अगेन'शी संघर्ष असूनही, चित्रपटानं आपल्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...


मोठी बातमी! छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; वयाच्या 35 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल?

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नितीन चौहानने (Nitin Chauhan) वयाच्या 35 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. नितीनने गुरुवारी मुंबईत निधन झाले. त्याच्या एका सहकलाकाराने सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. नितीनच्या जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. पण नितीनने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही.      

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

VIDEO : मम्मा दीपिकाच्या 'दुआ'ची पहिली झलक; दोन महिन्यांच्या चिमुकलीला उराशी बिलगल्याचा VIDEO Viral

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी पहिल्या बाळाचं स्वागत केलं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या चिमुकल्या राजकुमारीच्यी नावाची घोषणा केली. रणवीर आणि दीपिकाने मुलीचं नाव दुआ ठेवलं आहे. आता आई दीपिका डिलिव्हरीनंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आली आहे. इतकंच काय तर दो महिन्यानंतर लाडक्या दुआची पहिली झलक मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आई आणि लेकीचा घराबाहेर पडल्याचा व्हिडीओ समोर आली आहे. ज्यामध्ये दीपिकाच्या उराशी चिमुकली दुआ बिलगलेली असून बाजूला रणवीर सिंह दिसत आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Embed widget