Telly Masala : विश्वास दाखवून सागर करणार कार्तिकचा करेक्ट कार्यक्रम! ते मंगेशकर पुरस्कारांचं मागील वर्षीच अमिताभ यांना होतं आमंत्रण, पण खोटं कारण सांगून जाणं टाळलं;जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Premachi Goshta Serial Update : विश्वास दाखवून सागर करणार कार्तिकचा करेक्ट कार्यक्रम! मुक्तासोबत सई दिल्लीला जाणार?
'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेच्या कथानकात आता नवीन वळणं येत आहेत. मुक्ताचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सागरची धडपड सुरू आहे. तर, दुसरीकडे सईची कस्टडी न मिळाल्याने सावनीचा चांगलाच जळफळाट होत आहे. सागर आता कार्तिकवर विश्वास दाखवणार आहे. पण, त्यामागे त्याची खेळी आहे. आता नेमकं सागर काय करणार? मुक्ता सईला घेऊन दिल्लीला जाणार का, अशा अनेक प्रश्नांची प्रेक्षकांना मिळणार आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Amitabh Bachchan : मंगेशकर पुरस्कारांचं मागील वर्षीच अमिताभ यांना होतं आमंत्रण, पण खोटं कारण सांगून जाणं टाळलं; यंदाच्या सोहळ्यात स्वत:च सांगितला किस्सा
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दीनानाथ नाट्यगृहात हा कार्यक्रम सोहळा पार पडला. मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आत्तापर्यंत सुमारे 212 व्यक्तींना गेल्या 34 वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (Lata Dinanath Mangeshkar Award 2024) या वर्षी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना प्रदान करण्यात आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Ashok Saraf : असामान्य कलाकाराच्या नावाने अन् असामान्य नटाच्या समोर हा पुरस्कार मिळणं..., मंगेशकर पुरस्कारानंतर अशोक सराफांनी व्यक्त केल्या भावना
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना पुन्हा एकदा एका मानाच्या पुरस्कारने गौरवण्यात आलं आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar Award 2024) प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्काराने अशोक सराफ यांचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. अमिताभ बच्चन, संपूर्ण मंगेशकर कुटुंबिय यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सोहळ्यानंतर अमिताभ यांच्यासमोर अशोकमामांनी भावनिक भाषण केलं.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Babil Khan Irrfan Khan: आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
दिवंगत अभिनेता इरफान खानचा ( Irrfan Khan) मुलगा बाबिल खान (Babil Khan) हा अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. बाबिलच्या कामाचे चांगले कौतुक झाले आहे. बाबिल हा सोशल मीडियावरही सक्रिय असतो. आपल्या पोस्टद्वारे तो आगामी प्रोजेक्टसची माहिती चाहत्यांना देतोच, शिवाय वडिलांच्या आठवणींना उजाळा देतो. मात्र, बाबिलच्या एका पोस्टमुळे चाहत्यांच्या चिंता वाढवल्या. बाबिलने या पोस्टमध्ये आपल्या दिवंगत वडिलांकडे जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने चाहतेही हैराण झाले आहे. तर, वडिलांच्या आठवणीत बाबूल व्याकूळ झाला असल्याने ही पोस्ट त्याने लिहिली असावी असे म्हटले जात आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Gulabi Sadi Song : सोशल मीडियावर वेड लावणारं 'गुलाबी साडी' गाणं कसं लिहिलं गेलं? संजू राठोडने सांगितला किस्सा
सध्या सोशल मीडियावर एका गाण्याने अक्षरश: वेड लावलंय. अगदी 70 आजींपासून ते बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतल्या अभिनेत्री, अभिनेत्यांना देखील गुलाबी साडी (Gulabi Sadi) या गाण्याची भुरळ पडली आहे. या गाण्यावरचे रिल्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत. इतकच नव्हे तर हे गाणं यंदाच्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार 2024 च्या मंचावर देखील सादर करण्यात आलं. त्यामुळे सध्या याच गाण्याची हवा सगळीकडे पाहायला मिळतेय.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kiran Mane : 'तू मराठाकार्ड खेळ', मालिकेतून काढलं तेव्हा बड्या नेत्याने दिला होता सल्ला; किरण माने म्हणाले, मला जातीचं...
अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश करत राजकारणातील इनिंगला सुरुवात केली. त्याआधी किरण माने हे नाव बराच काळ चर्चेत राहिलं होतं. स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतून किरण माने यांना काढून टाकण्यात आलं. सोशल मीडियावर केलल्या एका पोस्टमुळे त्यांना बरंच ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. त्यानंतर वाहिनीने त्यांना मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.