एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : विश्वास दाखवून सागर करणार कार्तिकचा करेक्ट कार्यक्रम! मुक्तासोबत सई दिल्लीला जाणार?

Premachi Goshta Serial Update : सागर आता कार्तिकवर विश्वास दाखवणार आहे. पण, त्यामागे त्याची खेळी आहे. आता नेमकं सागर काय करणार? मु्क्ता सईला घेऊन दिल्लीला जाणार का, अशा अनेक प्रश्नांची प्रेक्षकांना मिळणार आहेत.

Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेच्या कथानकात आता नवीन वळणं येत आहेत. मुक्ताचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सागरची धडपड सुरू आहे. तर, दुसरीकडे सईची कस्टडी न मिळाल्याने सावनीचा चांगलाच जळफळाट होत आहे. सागर आता कार्तिकवर विश्वास दाखवणार आहे. पण, त्यामागे त्याची खेळी आहे. आता नेमकं सागर काय करणार?  मुक्ता सईला घेऊन दिल्लीला जाणार का,  अशा अनेक प्रश्नांची  प्रेक्षकांना मिळणार आहेत. 

कार्तिकचे स्वाती समोर नाटक...

कार्तिक सावनीला फोन करून मला घर सोडून जावं लागेल. माझी दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करावी असे  कार्तिक सांगतो. तर, सावनी त्याला सुनावते. कार्तिकही सावनीला सुनावतो आणि तुमचा प्लान फसला, तुम्हाला सईची कस्टडी मिळाली नाही तर याचा माझा काय दोष काय, असे म्हणतो. 

घरी कार्तिक स्वातीसमोर आपले नाटक सुरूच ठेवतो. घरातल्या माणसांनी माझ्यावर आरोप केल्याने वाईट वाटले, आपण घर सोडून जाऊयात आणि पैसे नसले तरी मानाने राहुयात असे कार्तिक म्हणतो. आता आपण गावी जाऊन राहुयात असे सांगतो. स्वातीदेखील कार्तिकला साथ देते आपण गावी जाऊन राहुयात असे म्हणते. घरातून निसटण्याचा प्लान यशस्वी होईल असे कार्तिकला वाटते. 

सागर दाखवणार विश्वास...

तेवढ्यात सागर स्वाती-कार्तिकच्या रुममध्ये येतो आणि माझा कार्तिकवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगतो. चूक मुक्ताची असल्याचे सांगतो. मुक्ताचा खरा चेहरा दाखवल्याबद्दल  तुझे आभार असे म्हणतो आणि सागर कार्तिकचा फोन पाडतो. सागर कार्तिकचा फोन घेऊन जातो. सागरच्या बोलण्याने कार्तिक बेसावध होतो. 

सागर कार्तिकच्या मोबाईलवरून आरतीला भेटण्यासाठीचा मेसेज पाठवतो. आता, कार्तिकला काय हवंय असे बोलून आरती आलेल्या मेसेजनुसार भेटायला जाते. 

सावनीचा होणार जळफळाट...

दुसरीकडे हर्षवर्धनही सावनीवर चिडतो. जोपर्यंत सागर हरत नाही तोपर्यंत आपला साखरपुडा होणार नसल्याचे सांगतो. सावनीची चिडचिड होते. मुक्ताला चांगला धडा शिकवण्याचे मनात ठरवते. 

आदित्यला सागर खरं सांगणार का?

आदित्य इकडं सागरला फोन करून सईला मुक्तासोबत का पाठवतोय असे विचारतो. सागरही आदित्यला समजावतो. सईला मुक्ता खूप आवडते, तिच्या शिवाय राहू शकत नाही. त्यामुळे सध्या सईला मुक्तासोबत पाठवतोय असे सांगतो. आदित्य तुमचं मुक्तावर प्रेम नाही का, असे विचारतो. सागर या प्रश्नाचे उत्तर देणे टाळतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget