एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala :  मुक्ताच्या जखमेवर मीठ चोळायला आली पण सावनीचाच होणार जळफळाट ते चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या पोस्टवर किरण मानेंची कमेंट; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Premachi Goshta Serial Update : मुक्ताच्या जखमेवर मीठ चोळायला आली पण सावनीचाच होणार जळफळाट

'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत सध्या वेगळा ट्रॅक आला आहे. मुक्ताही माहेरी परतली आहे. तर, दुसरीकडे सागरचा संसार मोडणार म्हणून सावनी आनंदात आहे. मुक्ताच्या जखमेवर मीठ चोळण्याची संधी सावनीला दिसते. पण, मुक्ताच्या प्रत्युत्तराने तिचाच जळफळाट होतो. तर, सागर मुक्ताला सईवर तुमचाच अधिकार असल्याचे सांगतो. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Kiran Mane Post : मी ब्राह्मण, तो त्वष्टा कासार, हे सांगणं भलत्याच दिशेने नेणारं,  चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या पोस्टवर किरण मानेंची कमेंट!

सध्या सोशल मीडियावर चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा विषय बराच तापला आहे. मुलाचं नाव जहांगीर, महाराजांची भूमिका साकारणं या दोन मुद्द्यांना एकत्र करुन चिन्मय आणि त्याच्या मुलाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं आहे. त्यावर सुरुवातीला चिन्मयच्या पत्नीने एक व्हिडिओ पोस्ट करत या सगळ्यावर तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर चिन्मयने महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. पण या सगळ्यात नेहाने (Neha Joshi Mandlekar) म्हणजेच चिन्मयच्या पत्नीने तिच्या व्हिडिओमध्ये केलेल्या जात आणि धर्माच्या उल्लेखावरुन किरण माने (Kiran Mane) यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Chinmay Mandlekar : 'असल्या ट्रोलर्सवर कडक कारवाई...', प्रसिद्ध दिग्दर्शकाने चिन्मयसाठी महाराष्ट्र सरकारकडे केली विशेष मागणी 

मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे अभिनेता चिन्मय मांडलेकरला (Chinmay Mandlekar) मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला समोरं जावं लागलं. त्यानंतर चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोशल मीडियासह मराठी सिनेसृष्टीचं वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं. अनेक कलाकारांनी पोस्ट करत चिन्मयला झालेल्या ट्रोलिंगच्या त्रासाचा तीव्र निषेध केला. त्याचप्रमाणे त्यांनी चिन्मयला त्याचा निर्णय मागे घेण्याची देखील विनंती केली. त्यानंतर आता एका प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने देखील चिन्मयसाठी पोस्ट करत महाराष्ट्र सरकारकडेच विशेष मागणी केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आता एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायकांची एन्ट्री, हाती लागली महत्त्वाची लीड; गुजरात कनेक्शनचा उलगडा

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबारानंतर बॉलीवूडसह संपूर्ण देश हादरला. या गोळीबाराचं कनेक्शन थेट बिष्णोई गँगसोबत लावण्यात आलं. त्यानंतर त्याचे अनेक दाखलेही समोर आले. रविवार 14 एप्रिल रोजी सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर 48 तासांत यातील आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणात आता एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक (Daya Nayak) यांची एन्ट्री झाली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Amitabh Bachchan : बिग बींचा सेटवरच दिग्दर्शकासोबत जोरदार वाद, अन् रात्री फोन करून म्हणाले...

 बॉलिवूडचे शहेनशाह, बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. अमिताभ बच्चन हे वयाच्या 81 व्या वर्षीदेखील चांगलेच सक्रीय आहेत. अमिताभ बच्चन हे सेटवर वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. नवख्या दिग्दर्शकांनासोबतही ते सहजपणे काम करतात. सेटवर अमिताभ बच्चन काहीवेळेस आपल्या सूचना देत असल्याचे म्हटले जाते. अशाच एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांचे एका सीनच्या शूटवरून दिग्दर्शकासोबत जोरदार वाजले होते. मात्र, त्यानंतर रात्री अमिताभ यांनी पुन्हा दिग्दर्शकाला फोन केला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Manoj Jarange Patil : "संघर्षयोद्धा" चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, संतप्त मनोज जरांगे पाटलांचा इशारा म्हणाले, जाणीवपूर्वक...

 मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा उभारणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा जीवनपट असणारा   "संघर्षयोद्धा"  चित्रपट ( Sangharsh Yoddha Movie) हा सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे. मागील काही महिन्यांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट अडवून धरला आहे.  "संघर्षयोद्धा"  हा चित्रपट 26 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. मात्र, रिलीजच्या काही दिवसआधीच या चित्रपटाला आपली तारीख पुढे ढकलावी लागली आहे. मनोज जरांगे पाटील यांनीदेखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget