(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Premachi Goshta Serial Update : मुक्ताच्या जखमेवर मीठ चोळायला आली पण सावनीचाच होणार जळफळाट
Premachi Goshta Serial Update : मुक्ताच्या जखमेवर मीठ चोळण्याची संधी सावनीला दिसते. पण, मुक्ताच्या प्रत्युत्तराने तिचाच जळफळाट होतो. तर, सागर मुक्ताला सईवर तुमचाच अधिकार असल्याचे सांगतो.
Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत सध्या वेगळा ट्रॅक आला आहे. मुक्ताही माहेरी परतली आहे. तर, दुसरीकडे सागरचा संसार मोडणार म्हणून सावनी आनंदात आहे. मुक्ताच्या जखमेवर मीठ चोळण्याची संधी सावनीला दिसते. पण, मुक्ताच्या प्रत्युत्तराने तिचाच जळफळाट होतो. तर, सागर मुक्ताला सईवर तुमचाच अधिकार असल्याचे सांगतो.
मुक्ता घराबाहेर, सावनीला होणार आनंद
मुक्ताला घरातून बाहेर काढलं असल्याचे कार्तिक सावनीला मेसेज पाठवून सांगतो. यामुळे सावनीला खूप आनंद होतो. सावनी हर्षवर्धनला हे सांगत असताना आदित्य ऐकतो. आता मी, मम्मी-पप्पा एकत्र राहणार असल्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे आदित्यला वाटते. तर, दुसरीकडे आता आपण आता मी आणखी एक घाव घालणार असून सागरचा संसार मोडणार असल्याचे सांगते. हर्षवर्धन सावनीचे कौतुक करतो आणि तुझा डाव यशस्वी झाल्यास लग्न करणार असल्याचे सांगतो.
मुक्ताई न दिसल्याने सई झाली कासावीस...
सई सकाळी झोपेतून उठते तेव्हा ती आजीच्या खोलीत असल्याचे समजते. माझ्या खोलीतून तुझ्या खोलीत कशी आली असा प्रश्न सई इंद्राला विचारते. सईला मुक्ताला भेटायचे असते. इंद्राची चिडचिड होत असते. मुक्ता ही तिच्या आईला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली असल्याचे सागर सईला सांगतो. त्यानंतर सागर सईला घेऊन मुक्ताला घेऊन तिच्या घरी जातो.
मुक्ताला आली नव्या नोकरीची ऑफर
मुक्ताला कामाच्या निमित्ताने एक नवीन संधी उपलब्ध होते, पण त्यासाठी तिला दिल्लीत जावे लागणार असते. पुरू आणि माधवी मुक्ताला ही ऑफर स्वीकारण्यास सांगतात. पण मुक्ता सई माझ्यासाठी प्राथमिकता असल्याचे सांगते. त्यावर दोघेही सईचे आपण पाहून घेऊ असे म्हणतात. पुरु-माधवी मुक्ताला समजावत असतात. ही संधी सोडू नको असे सांगताना ही वेळ योग्य असल्याचे सांगतात.
मुक्ता आणि पुरु-माधवीचं बोलणं सुरू असताना सागर-सई येतात. त्यावर सई, मला सोडून एकटी कुठे चालली असे सांगते. सागर दूर उभं असल्याचे पाहून सई त्याला जवळ बोलवते. पुरू-माधवी तिथून निघून जातात.
मुक्तावर सागर दाखवणार विश्वास...
सागर मुक्ताचे दिल्लीतील संधीसाठी अभिनंदन करतो. हवंतर तुम्ही सईला देखील दिल्लीला आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता. सई तुमच्याशिवाय घरी राहू शकत नाही, हे तुम्हालाही माहित आहे, असे सागर मुक्ताला सांगतो.
रात्री घरी घडलेल्या प्रकारावर मुक्ता सागरवर प्रश्न उपस्थित करते. पाहिजे तेव्हा विश्वास ठेवायचा आणि नको तेव्हा विश्वास ठेवायचा नाही असे म्हणता. उद्या मी सईचे अपहरण केलं असे तुम्ही म्हणालं. यावर सागर मी तुम्हाला आणि सईला कधीच वेगळं करणार नसल्याचे म्हणतो. मला सईचा आनंद कशात आहे हे मला माहित आहे, असे सागर सांगतो.
सावनीचा होणार जळफळाट...
सावनी मुक्ताच्या घरी जाऊन तिच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करते. मु्क्ता सावनीला घरात न घेता तिला दारात उभी करते आणि तिला इथं का आली, हे विचारते. त्यावर सावनी मुक्ताचे कान भरत तिला डिवचण्याचा प्रयत्न करते. तुमचं लग्न फार काळ टिकणार नाही असे सांगितले होते. पण, तू ऐकले नाहीस. तू सागरसाठी किती आणि काय काय त्याग केले, हे सावनी सांगते. तरीही तुला घरातून बाहेर काढले आणि हे सगळं होत असताना सागर हा दगडासारखा उभा होता असे सावनी मुक्ताला सांगते. मुक्तादेखील सावनीला तिच्याच भाषेत प्रत्युत्तर देते आणि तिला चांगलेच सुनावते. मुक्ताला डिवचण्यासाठी आलेल्या सावनीची चांगलीच चिडचिड होते.
सावनीला उत्तर दिले असले तरी तिचे बोलणे मुक्ताला बोचत असते. त्यामुळे घरात येऊन ती भावूक होते. त्यावेळी सई येते आणि मुक्ताला रडण्याचे कारण विचारते. त्यावर मुक्ता डोळ्यात कचरा गेला असल्याचे सांगते. त्यावर सई मुक्ताच्या डोळ्यात फुंकर मारते.