Telly Masala : नव्या मालिकेसाठी 'स्टार प्रवाह'वरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ते शाहरुखला रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीही स्थिर;जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Marathi Serial Updates Star Pravah : नव्या मालिकेसाठी 'स्टार प्रवाह'वरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, शेवट कसा असणार?
छोट्या पडद्यावर सध्या आता नव्या मालिकांचा बोलबाला आहे. आता आणखी काही नवीन मालिका सुरू होणार आहेत. आता स्टार प्रवाहवर आणखी दोन नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी आता सुरू असलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ (Yad Lagla Premacha) आणि ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ (Thoda Tujha Thoda Majha) या दोन मालिका सुरू होणार आहेत. त्यासाठी आता सध्या सुरू असलेल्या मालिका निरोप घेणार आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Shah Rukh Khan Discharged: शाहरुखला रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीही स्थिर; फायनल पाहण्यासाठी शाहरुख मैदानात दिसणार?
शाहरुख खानला (Shah Rukh Khan Health Update) 22 मे रोजी डिहायड्रेशनमुळे अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याची पत्नी गौरी खान हिला ही माहिती मिळताच तिनेही तात्काळ हॉस्पिटल गाठले. अभिनेत्री जुही चावलानेही तिचा मित्र आणि KKR टीम पार्टनर शाहरुखच्या तब्येतीची विचारपूस केली होती. पण आता शाहरुखला डिस्चार्ज देण्यात आला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Crime News : 'कपिल शर्मा शो'मध्ये काम मिळवून देतो सांगून घरी नेलं अन् सर्वस्व लुटलं; विवाहितेवर अत्याचार; घटनेने सिनेसृष्टी हादरली
सिनेसृष्टीला हादवरुन टाकणारी घटना सध्या समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम कपिल शर्मा शोच्या (The Kapil Sharma Show) नावाखाली एका महिलेची फसवणूक करुन तिच्यावर बलात्काराची घटना घडली आहे. नालासोपाऱ्यातील ही घटना असून त्या महिलेला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. दरम्यान या प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sachin Goswami : 'पांढऱ्या केसांनी सिनियर सिटिझन कॅटेगरीत आणलं', मतदानादिवशी सचिन गोस्वामी यांच्यासोबत घडला भन्नाट किस्सा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे दिग्दर्शक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) हे कायमच त्यांच्या निखळ विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आलेत. या कार्यक्रमात त्यांनी लिहिलेले जोक असोत किंवा इतकी वर्ष प्रेक्षकांना हसवण्याचं शिवधनुष्यही त्यांनी अगदी लिलया पेललं आहे. त्यातच नुकतच त्यांनी केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Jui Gadkari : 'सायलीला रडवणारी साक्षी जेव्हा रडते...', मालिका रंजक वळणावर असतानाच जुई गडकरीच्या पोस्टनं वेधलं लक्ष
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या पसंतीस ही मालिका आणि या मालिकेतील सून म्हणजेच सायलीही पसंतीस पडत आहे. सायलीची भूमिका ही अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) साकारत आहे. प्रत्येक संकटावर मात करत सायली तिचा संसार कसा सांभाळते असा सर्वसाधारण मालिकेचा आशय आहे. या मालिकेत अभिनेत्री केतकी विलास (Ketaki Vilas) ही खलनायिकेच्या भूमिकेत असून ती साक्षी शिखरे हे पात्र साकारत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kalki 2898 AD Teaser: 'कल्की'चा नवा टीझर लॉन्च, प्रभासचा पहिली लूक समोर, रामोजी फिल्मसिटीमध्ये पार पडला स्पेशल शो
नाग अश्विनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD Teaser) ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याने चाहत्यांची बरीच निराशा झाल्याचं पाहायला मिळतंय. पण चाहत्यांची उत्सुकता वाढण्यासाठी निर्मात्यांकडून सिनेमाचा नवीन टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही नाराजी काहीशी दूर झाल्याचं पाहायला मिळतंय. हा सिनेमा आता 27 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी सिनेमाचा नवीन टीझर लॉन्च करण्यात आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Panchayat Season 3 : 'पंचायत-3' मधील कथानकात काय असणार? रिलीज आधीच समोर आली अपडेट
वेब सीरीज 'पंचायत'च्या तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याची रिलीज डेट आता जवळ येऊ लागली आहे. 'पंचायत-3' च्या (Panchayat Season-3) रिलीज आधीच यंदा सीझनमधील नव्या कथानकात काय असेल, याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी 'पंचायत-3' चा ट्रेलर लाँच करण्यात आला. त्यानुसार, आता फुलेरा गावात सरपंच पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी दिसून येणार आहे. 'पंचायत-3' बद्दल दिग्दर्शक दीपक मिश्राने काही गोष्टी उघड केल्या आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Priyadarshan Jadhav : 'अन् त्याने तो फोन चोरला...', प्रियदर्शन जाधवने सांगितला इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेत्याचा खास किस्सा
विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला अभिनेता प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) हा आता एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियदर्शन हा लवकरच शक्तिमान या सिनेमात झळकणार आहे.हा सिनेमा 24 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. या सिनेमात प्रियदर्शनसह आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि स्पृहा जोशीही (Spruha Joshi) मुख्य भूमिकेत आहेत. सध्या हा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तिन्ही कलाकार व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय. कलाविश्वात कलाकार म्हणून वावरत असलेली ही मंडळी खऱ्या आयुष्यात मात्र एकमेकांचे घट्ट मित्रही असतात. अशाच एका मित्राचा किस्सा प्रियदर्शनने नुकताच शेअर केला आहे.