एक्स्प्लोर

Telly Masala : विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर कंगनाला बॉलीवूडचा पाठिंबा नाही? ते गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं; मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Kangana Ranaut :  विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर कंगनाला बॉलीवूडचा पाठिंबा नाही? अभिनेत्री केली संतप्त पोस्ट, म्हणाली, 'तुमच्या मुलांसोबत...' 

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आता खासदार म्हणून संसदेत प्रवेश करत आहे. पण त्यापूर्वी ही अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे सध्या बरीच चर्चेत आली आहे. त्याचं झालं असं की, चंदीगढ विमानतळावर एका सुरक्षारक्षक महिलेने कंगनाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर कंगनाचे तिचा संतापही व्यक्त केला. दरम्यान या प्रकरणाची सध्या बरीच चर्चा असून या CISF महिला जवानावर कारवाई करण्यात येणर असल्याचं देखील सांगितलं आहे. पण इतकं सगळं असताना कंगनाने एका वेगळ्याच गोष्टीवरुन संताप व्यक्त केला आहे. बरं हा संताप या अभिनेत्रीने संपूर्ण बॉलीवूडवर व्यक्त केलाय. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Kangana Ranaut : शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...

चंदिगड विमानतळावर कानशिलात लगावल्याची घटना घडल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) सोशल मीडियावर  या घटनेशी संबंधित काही पोस्ट केल्या आहेत. CISF ची महिला जवान कुलविंदर कौरने कंगनाला शेतकरी आंदोलनावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत कानशिलात लगावले असल्याचे सांगण्यात आले. आता कंगनाने आपल्यावर झालेला हल्ला हा शेतकरी आंदोलनाशी संबंधित नसल्याचे म्हटले. सीआयएसएफच्या महिला जवानाला राजकारणासाठी खलिस्तानींना सामिल व्हायचे असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Chahat Fateh Ali Khan Bado Badi : गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण

 पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खान (Chahat Fateh Ali Khan ) यांच्या  'बदो बदी' या गाण्याविरोधात युट्युबने कठोर कारवाई केली आहे. युट्युबने आपल्या प्लॅटफॉर्मवरून हे गाणं डिलीट केले आहे. 28 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेले हे गाणं डिलीट झाल्याने गायक चाहत फतेह अली खान ढसा ढसा रडले. त्यांचा फोटो व्हायरल होत आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या गाण्यावर अनेक रील्स आले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Hamare Baarah Movie Release : 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने कोणते निर्देश दिले?

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'हमारे बारह' (Hamare Baarah Movie) चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद हटवणार असल्याची हमी निर्मात्यांनी दिल्यानंतर रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. सेन्सॉर बोर्डानं नेमलेली समिती चित्रपटाबाबतची अहवाल वेळेत देण्यात अपयशी ठरली. मात्र समितीच्या अपयशामुळे चित्रपट प्रदर्शन रोखू शकत नाही असे मुंबई हायकोर्टाने म्हटले. 130 कोटींची लोकसंख्या असलेल्या देशात एका व्यक्तीसाठी सिनेनाचं प्रदर्शन रोखता येणार नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

OTT Release This Weekend:  ड्रामा, सस्पेन्स थ्रिलर ते अॅक्शनपटाची मेजवानी, ओटीटीवर या वीकेंडला काय पाहाल?

हा वीकेंड प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, सीरिज रिलीज झाले आहेत. यापैकी काही वेब सीरिज, चित्रपट आधीच OTT वर रिलीज झाले आहेत. रोमान्स, अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा अशा वेगवेगळ्या  धाटणीच्या प्रेक्षकांना चित्रपट, वेब सीरिज पाहता येणार आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा  

Premachi Goshta Serial Update : मिहिरच्या सुटकेसाठी सावनी सरसावली, स्वातीमुळे कार्तिक तुरुंगात; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहाल?

 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत आता वळण येणार आहे.  तुरुंगात असलेल्या भावाच्या सुटकेसाठी सावनी पोलिसांकडे जाते. तर, स्वातीदेखील पोलिसांत जबाब देते. हर्षवर्धन सावनीकडे लग्नासाठी अट ठेवतो. आता सावनी काय करणार, मिहिर आणि सावनीमधील भांडणे दूर होतील का,  या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये मिळतील. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget