Kangana Ranaut : शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
Kangana Ranaut : चंदिगड विमानतळावर कानशिलात लगावल्याची घटना घडल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित काही पोस्ट केल्या आहेत. आता कंगनाने आपल्यावर झालेला हल्ला हा शेतकरी आंदोलनाशी संबंधित नसल्याचे म्हटले आहे.
Kangana Ranaut : चंदिगड विमानतळावर कानशिलात लगावल्याची घटना घडल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित काही पोस्ट केल्या आहेत. CISF ची महिला जवान कुलविंदर कौरने कंगनाला शेतकरी आंदोलनावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत कानशिलात लगावले असल्याचे सांगण्यात आले. आता कंगनाने आपल्यावर झालेला हल्ला हा शेतकरी आंदोलनाशी संबंधित नसल्याचे म्हटले. सीआयएसएफच्या महिला जवानाला राजकारणासाठी खलिस्तानींना सामिल व्हायचे असल्याचा आरोप कंगनाने केला आहे.
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत गुरुवारी दिल्लीला रवाना झाली. त्या दरम्यान ती चंदिगड विमानतळावर असताना तिला सीआयएसएफच्या महिला जवानाने मारहाण केली असल्याचे कंगनाने म्हटले.
त्यामुळेच कुलविंदरने केला हल्ला
गुरुवारी चंदीगडहून दिल्लीला निघालेल्या कंगना राणौतला विमानतळावर CISF महिला जवान कुलविंदर कौरने थप्पड मारली. या घटनेनंतर कंगनाने व्हिडिओ शेअर करत ती ठीक असल्याचे तिच्या चाहत्यांना सांगितले. त्यानंतर कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही पोस्ट केल्या आहेत.
खलिस्तानीप्रमाणे माझ्या मागून...
कंगनाने म्हटले की, एका रणनीतिनुसार, त्यांनी मी बाहेर येण्याची प्रतीक्षा पाहिली. एखाद्या खलिस्तानी प्रमाणे गुपचूप मागून आली आणि काहीच न बोलता माझ्या गालावर थप्पड मारली. तू असे का केलं मी विचारल्यावर तिने दुसरीकडे पाहत भाष्य केले. त्यावेळी तिच्याकडे मोबाईल कॅमेरे वळले होते. तिला शेतकरी आंदोलनाशी काहीही देणंघेणं नसून खलिस्तानी चळवळीत तिला सामिल व्हायचे आहे, असे कंगनाने म्हटले.
कंगनाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर खलिस्तानी आंदोलनावर भाष्य केले.भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या खलिस्तानींनी केली होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येचे चित्र पोस्ट केले आहे. एका वृद्ध स्त्रीला तिच्या घरात युनिफॉर्म मध्ये असलेल्या तिच्या सुरक्षा रक्षकांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. या सुरक्षा रक्षकांवर मोठा विश्वास व्यक्त केला होता, असे कंगनाने म्हटले.
महिला जवानाने काय म्हटले? घटनेनंतरचा व्हिडीओ समोर...
महिला जवानाने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. "माझी आई आंदोलनासाठी बसली होती, तेव्हा हिने शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केली होती", असं कंगनाला रणौतला कानशिलात लावणारी CISF जवान कुलविंदर कौरने म्हटले.