Kangana Ranaut : विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर कंगनाला बॉलीवूडचा पाठिंबा नाही? अभिनेत्री केली संतप्त पोस्ट, म्हणाली, 'तुमच्या मुलांसोबत...'
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौतवर विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर वातावरण बरंच तापलं. पण कंगनाला या प्रकरणानंतर बॉलीवूडमधून कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळत नसल्याचं चित्र आहे.
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आता खासदार म्हणून संसदेत प्रवेश करत आहे. पण त्यापूर्वी ही अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे सध्या बरीच चर्चेत आली आहे. त्याचं झालं असं की, चंदीगढ विमानतळावर एका सुरक्षारक्षक महिलेने कंगनाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर कंगनाचे तिचा संतापही व्यक्त केला. दरम्यान या प्रकरणाची सध्या बरीच चर्चा असून या CISF महिला जवानावर कारवाई करण्यात येणर असल्याचं देखील सांगितलं आहे. पण इतकं सगळं असताना कंगनाने एका वेगळ्याच गोष्टीवरुन संताप व्यक्त केला आहे. बरं हा संताप या अभिनेत्रीने संपूर्ण बॉलीवूडवर व्यक्त केलाय.
काही दिवसांपूर्वी ऑल आईज ऑन रफाह या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांनी शेअर केल्या होत्या. त्यामध्ये अनेक सेलिब्रेटींचा देखील समावेश होता. त्याचाच संदर्भ देऊन कंगनाने बॉलीवूडकरांवर टीका केलीये. त्याचप्रमाणे तिच्या पाठिशी कोणीच उभं न राहिल्याचा रोषही तिने व्यक्त केला आहे. यासाठी कंगनाने एक पोस्ट केली होती. पण त्यानंतर तिने पहिली पोस्ट डिलीट केली.
कंगनाने केलेली पहिली पोस्ट काय होती?
कंगनाने तिच्या सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली होती की, 'प्रिय फिल्म इंडस्ट्री, तुम्ही सर्वजण माझ्यावर विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा आनंद साजरा करत आहात किंवा त्यावर पूर्ण मौन बाळगून आहात. पण लक्षात ठेवा, उद्या तुम्ही आपल्या देशात किंवा जगात कुठेही रस्त्यावर फिरत असाल, तेव्हा काही इस्रायली, पॅलेस्टिनी तुमच्यावर किंवा तुमच्या मुलावर हल्ला करतील, तेही फक्त याचसाठी की तुम्ही सर्वजण राफाहच्या समर्थनार्थ उभे होता होतात, त्यावेळी तुम्ही पाहाल की मी तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढेन. जर एखाद्या दिवशी तुम्हाला वाटेल मी का आणि मी कुठे आहे, तर लक्षात ठेवा तुम्ही मी नाहीत.' पण काही वेळातच तिने ही पोस्ट डिलीट केली.
कंगनाने केलेली दुसरी पोस्ट नेमकी काय?
कंगनाने तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं की, ऑल आईज ऑन रफाह गँग, हे तुमच्यासोबत किंवा तुमच्या मुलांसोबतही घडू शकतं. जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर होणारा दहशतावादी हल्ला साजरा करता तेव्हा तो तुमच्यावरही कधीतरी होईल याची देखील तयारी ठेवा. दरम्यान कंगनाच्या हल्ल्यावर बॉलीवूडकर शांत असल्याने कंगनाने तिचा हा रोष व्यक्त केला आहे.