एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : मिहिरच्या सुटकेसाठी सावनी सरसावली, स्वातीमुळे कार्तिक तुरुंगात; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहाल?

Premachi Goshta Serial Update : तुरुंगात असलेल्या भावाच्या सुटकेसाठी सावनी पोलिसांकडे जाते. तर, स्वातीदेखील पोलिसांत जबाब देते. हर्षवर्धन सावनीकडे लग्नासाठी अट ठेवतो. आता सावनी काय करणार, मिहिर आणि सावनीमधील भांडणे दूर होतील का,

Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत आता वळण येणार आहे.  तुरुंगात असलेल्या भावाच्या सुटकेसाठी सावनी पोलिसांकडे जाते. तर, स्वातीदेखील पोलिसांत जबाब देते. हर्षवर्धन सावनीकडे लग्नासाठी अट ठेवतो. आता सावनी काय करणार, मिहिर आणि सावनीमधील भांडणे दूर होतील का,  या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये मिळतील. 

मिहिरच्या सुटकेसाठी सावनीचे प्रयत्न 

मिहिरला तुरुंगात गेल्यानंतर सावनी पोलीस स्टेशनला जाते आणि त्याला सोडवण्याची विनंती करते. मिहिरच्या लग्नासाठी मी हे सोनं खरेदी केले होते. डेस्टिनेशन वेडिंगसाठी काही रोख रक्कम होती. हे सगळं एका बॅगेत ठेवले होते. ही बॅग सागरला अडकवण्यासाठी कार्तिकने घरातून चोरली असल्याचे सावनी पोलिसांना सांगते. या प्रकरणात सागर आणि मिहिरची चूक नसल्याचे सावनी सांगते.

स्वातीदेखील पोलीस स्टेशनला आलेली असते. कार्तिकच्या सांगण्यावरून आपण ही बॅग आमच्या घरात ठेवली असल्याचे स्वाती सांगते. मी पोलीस स्टेशनला तक्रार करायला आली होते, पण त्याने माझे अपहरण केले असल्याचे स्वाती सांगते. तेवढ्यात कार्तिकला पोलीस ठाण्यात येतो आणि हे सगळं काय सुरू आहे हे विचारतो. स्वाती धीर ठेवत ती बॅग ह्या माणसाने सागरच्या घरात ठेवायला सांगितली आहे, असे सांगते. कार्तिकला पोलीस अटक करतात. 

हर्षवर्धनची सावनीकडे लग्नासाठी अट

मिहिरची सुटका झाल्यानंतर सगळ्यांना आनंद वाटतो. मिहिरने आपल्याकडे पाहिलेदेखील नाही, याचे सावनीला वाईट वाटते.  मिहिरची सुटका केल्याने हर्षवर्धन सावनीवर चिडतो.  मिहिर हा सागरचा राईट हँड आहे, तो तुरुंगात असल्यानंतरही आपण सागरचे मोठे नुकसान केले  असते असे हर्षवर्धन सावनीला सांगतो. त्यावर सावनी म्हणते की, हर्षवर्धन हा माझा भाऊ आहे. तो तुरुंगात असताना मी सेलिब्रेशन नाही करू शकत, त्याचे तुरुंगात असणे हा माझ्यासाठी पराभवच आहे असे सावनी सांगते. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की, माझं चुकलं, मला माफ कर. तुला माझ्यासोबत लग्न करायचे असेल तर तुझ्या भावाला माझ्या पाया पडून तुझ्यासोबत लग्न करायला सांग असे हर्षवर्धन सांगतो. 

कोळी कुटुंबाच्या घरी आनंदाचे वातावरण, सावनी घालणार वाद

इकडं कोळी कुटुंबात मिहिरच्या लग्नाच्या तयारीची चर्चा सुरू असते. सगळेजण लग्नातील मेन्यू काय असेल, ड्रेस कोड काय असेल याची चर्चा सुरू असते. बऱ्याच दिवसांनी कोळी कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. मिहिर मुक्ताला माझी करवली म्हणून उभी राहशील का असे विचारतो. हे सगळे सावनी पाहत असते. सावनीला हे पाहताच वाईट वाटते. सावनी आलेली पाहून सगळ्यांना धक्का बसतो. सावनी मुक्ताला उलटसुलट बोलते. जे तुझ्याकडे नाही, ते माझ्याकडून हिसकावून घेतेस. तू आई होऊ शकत नाही म्हणून माझी सईला हिसकावलं, आता आदित्यवर डोळा असल्याचे सावनी म्हणते. सावनीच्या बेछुट बोलण्यावर सागर भडकतो. तुला इथे कोणी बोलावलं नाही तरीही इथे का आलीस असे सावनीला विचारतो. त्यावर  सावनी म्हणते की तू यातून लांब राहा. भांडण माझा आणि मुक्ताचे आहे, तू मध्ये पडू नको. 

यावर मिहिरमध्ये बोलतो की, या घरात सुखाचा संसार सुरू असताना तूच सोडून गेली. त्यावर सावनी म्हणते की तो संसार माझ्यासाठी कधीच सुखाचा नव्हता. आज मी हर्षसोबत असून सुखी आहे. तो माझ्याशी लग्न करणार असून त्याने एक अट ठेवली आहे. मिहिरने त्याच्यासोबत जाऊन लग्नाची बोलणी करावी अशी अट असल्याचे सावनी सांगते. हर्षवर्धनची अट ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
राज्यातील 6 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 6 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
राज्यातील 6 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 6 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget