एक्स्प्लोर

Telly Masala : सावनीच्या ठिणगीने सागर-मुक्ताच्या संसारात संशयाची आग भडकणार? ते 'राजा शिवाजी' रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची नवी कलाकृती; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Premachi Goshta Marathi Serial Updates : सावनीच्या ठिणगीने सागर-मुक्ताच्या संसारात संशयाची आग भडकणार? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय घडणार?

 सागर आणि मुक्तामध्ये प्रेमाचा अंकुर फुटत असताना सावनी (Savani) आता या दोघांच्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा फूट पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. सावनी सागरच्या (Sagar Koli Premachi Goshta) मनात मुक्ताबद्दल (Mukta Koli Premachi Goshta) संशयाचे भूत निर्माण करणार आहे. आता या संशयाला मुक्ता कसे दूर करणार, सई आणि तिच्या नात्यावर परिणाम होणार का, असे  अनेक प्रश्न आजच्या एपिसोडमध्ये निर्माण होणार आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

Riteish deshmukh :'राजा शिवाजी' रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची नवी कलाकृती, छत्रपतींच्या भूमिकेत स्वत: रितेश दिसणार? नवं पोस्टर आलं समोर

 अभिनेता रितेश देशमुख (Riteish deshmukh) याने नुकतच त्याच्या नव्या चित्रपटाची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) हा रितेश देशमुख दिग्दर्शित चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं एक नवं पोस्ट नुकतचं रितेशने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. मुबंई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओ यांची निर्मिती असून स्वत: रितेश देशमुख याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पण या पोस्टवरुन महाराजांच्या भूमिकेत नेमकं कोण दिसणार की रितेश स्वत: छत्रपतींची भूमिका साकारणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

Sara Kahi Tichyasathi : नीरजच्या अपहरणाचं सत्य रघुनाथ खोतांना कळलं? खोतांच्या घरात आता कोणतं नवं वादळ येणार? 'सारं काही तिच्यासाठी' मालिका रंजक वळणावर

'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) या मालिकेत सुरुवातीपासून बऱ्याच रंजक गोष्टी पाहायला मिळत आहे. त्यातच या गोष्टीचा आशय देखील शहर आणि ग्रामीण भागातील जीवनशैलीवर आहे, त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस देखील ही मालिका उतरतेय. सध्या या मालिकेत बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

Sukh Mhanje Nakki Kay Asta : नित्या-अधिराजचं नातं घेणार एक गोड वळण, जयदीप आणि गौरी साताजन्मासाठी पुन्हा एकत्र येणार

 स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. कारण आता अधिराज नित्यावरचं त्याचं प्रेम व्यक्त करणार आहे. जयदीप गौरीनंतर सुख म्हणजे काय असतं या मालिकेने एका नवा अध्याय सुरु केला. जयदीप आणि गौरीचं एक नवं आयुष्य दाखवण्यात येत होतं. पण पुन्हा एकदा जयदीप आणि गौरी हे अधिराज आणि नित्या म्हणून एकत्र येणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

Naseeruddin Shah :  तुमच्या दारावर ईडीची टकटक होऊ नये, पण तरीही...; नसिरुद्दीन शाह यांचा बॉलिवूडला सल्ला

रुपेरी पडद्यावर आणि रंगभूमीवर जेवढा दमदार अभिनय तेवढच्या स्पष्टपणे आपली सडेतोड मते व्यक्त करण्यासाठी अभिनेते नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या दर्जेदार चित्रपट निर्माण होणे बंद झाले असल्याने आपण चित्रपट पाहत नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले. तर, दुसरीकडे त्यांनी गंभीर आशयाचे, वास्तवदर्शी चित्रपट करणाऱ्यांनी सध्या समाजातील गंभीर परिस्थिती मांडावी. पण, तुमच्या विरोधात कोणताही फतवा अथवा तुमच्या दरवाजावर ईडीची (ED) टकटक होऊ नये अशा पद्धतीने चित्रपट निर्मिती करण्याचा सल्ला शाह यांनी दिला. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

Pooja Sawant Engagement Video : 'प्रेमावरचा माझा विश्वास उडाला होता पण तु आलास अन्...', पूजा सावंतने शेअर केला साखरपुड्याचा गोड व्हिडिओ

 सध्या मराठी सिनेसृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरु आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके (Sidharth Bodke) यांनी प्रेमाची कबुली दिली. तसेच नुकतच अनेक कलाकार विवाहबंधनात देखील अडकले. प्रथमेश परब (Prathamesh Parab), समीर विध्वंस (Sameer Vidhwans) यांचा साखरपुडा पार पडला. अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हीने सिद्धेश चव्हाण (Siddhesh Chavan) सोबत साखरपुडा करत तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली. दरम्यान तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारणAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'पतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr. Prakash Koyade यांच्याशी गप्पाABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
Pune: पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
Video : थारमधील बदमाशांनी पल्सरवरुन चाललेल्या कपलला भर रस्त्यात मधलं बोटं दाखवलं, तरुणालाही मारहाण; संतापलेल्या तरुणीने..
Video : थारमधील बदमाशांनी पल्सरवरुन चाललेल्या कपलला भर रस्त्यात मधलं बोटं दाखवलं, तरुणालाही मारहाण; संतापलेल्या तरुणीने..
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.