एक्स्प्लोर

Riteish deshmukh :'राजा शिवाजी' रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची नवी कलाकृती, छत्रपतींच्या भूमिकेत स्वत: रितेश दिसणार? नवं पोस्टर आलं समोर

riteish deshmukh : रितेश आणि जेनिलिया या दोघांनीही त्यांच्या आगामी चित्रपटासंदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे.

Riteish deshmukh New Movie : अभिनेता रितेश देशमुख (Riteish deshmukh) याने नुकतच त्याच्या नव्या चित्रपटाची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) हा रितेश देशमुख दिग्दर्शित चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं एक नवं पोस्ट नुकतचं रितेशने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. मुबंई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओ यांची निर्मिती असून स्वत: रितेश देशमुख याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पण या पोस्टवरुन महाराजांच्या भूमिकेत नेमकं कोण दिसणार की रितेश स्वत: छत्रपतींची भूमिका साकारणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

रितेश आणि जेनिलिया या दोघांनीही या चित्रपटासंदर्भात पोस्ट केली आहे. या दोघांच्या या पोस्टमुळे पुन्हा एका शिवरायांच्या इतिहास हा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच या चित्रपटात कोणती स्टारकास्ट असणार याबाबत देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटातील संगीताची जबाबदारी अजय-अतुल यांनी पेलवली आहे. तसेच ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी निर्मिती केलीये. या चित्रपटाचे छायांकन संतोष सिवन यांनी केलंय. तसेच हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

रितेशने पोस्टमध्ये काय म्हटलं?

इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे.शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….’राजा शिवाजी’, अशी पोस्ट रितेशने केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

जेनेलियानेही केली पोस्ट

तसेच जेनेलियाने देखील पोस्ट करत या चित्रपटाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. तिने म्हटलं की, गेली कित्येक वर्ष आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चरित्रपट पडद्यावर साकारता यावा हे स्वप्न उराशी बाळगून होतो.हे शिवधनुष्य पेलतांना एक भव्य चित्रपट साकारावा फक्त इतकाच हेतू नाही. हे एक असं राजवस्त्राचं नाजूक वीणकाम आहे ज्यात आपल्या इतिहासाची भव्यता आणि आपल्या संस्कृतीची समृद्धता आहे.‘राजा शिवाजी’ हे आमचं सगळ्यात मोठं स्वप्न. हे साकारत असतांना, ज्यांना अद्वितीय कामं करण्याचा ध्यासच आहे असे ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडीओ आमच्या साथीला आहेत. याहून सक्षम साथ असुच शकत नव्हती.  शिवगाथा सांगणं हा आमच्यासाठी सन्मान तर आहेच पण त्याहून मोठी जबाबदारी आहे ह्याची आम्हाला नम्र जाणीव आहे. आजच्या पवित्र दिनी आई जगदंबा , छत्रपती शिवरायांना वंदन करून आम्ही तुमच्या शुभेच्छा पाठीशी असतील अशी आशा करतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

ही बातमी वाचा : 

Riteish Deshmukh : विलासरावांनी काँग्रेस सोडली होती, तुम्ही जा आणि..., नेटकऱ्यांच्या प्रश्नाला रितेश देशमुखचं उत्तर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Netflix Tending Film: OTT वर येताच top वर ट्रेंड होतेय 2 तासांची डार्क कॉमेडी! फॅमिलीसोबत पाहायलाच हवी अशी फिल्म
OTT वर येताच top वर ट्रेंड होतेय 2 तासांची डार्क कॉमेडी! फॅमिलीसोबत पाहायलाच हवी अशी फिल्म
Bigg Boss Marathi 6 Winner Name: फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
Kangana Ranaut on Chirag Paswan: '..त्याच्याशी रोमांस असला असता तर आतापर्यंत मुलं...'; केंद्रीय मंत्र्याबाबत कंगना रणौत काय बोलून गेली?
'..त्याच्याशी रोमांस असला असता तर आतापर्यंत मुलं...'; केंद्रीय मंत्र्याबाबत कंगना रणौत काय बोलून गेली?
Jai Jai Swami Samartha: तिकडे 'देऊळ बंद 2' च्या पोस्टरची चर्चा, इकडे 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतही मोठी घडामोड; अंधविश्वासाचा बागुलबुवा स्वामी मोडून काढणार
तिकडे 'देऊळ बंद 2' च्या पोस्टरची चर्चा, इकडे 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतही मोठी घडामोड; अंधविश्वासाचा बागुलबुवा स्वामी मोडून काढणार

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
Amit Shah : 2029 पर्यंत ज्या निवडणुका होतील, त्या जुन्याच जागांप्रमाणं होतील; दक्षिण भारतात किती जागा वाढणार, अमित शाहांनी समजावून सांगितलं
2029 पर्यंत ज्या निवडणुका होतील, त्या जुन्याच जागांप्रमाणं होतील: अमित शाह
Embed widget