Pooja Sawant Engagement Video : 'प्रेमावरचा माझा विश्वास उडाला होता पण तु आलास अन्...', पूजा सावंतने शेअर केला साखरपुड्याचा गोड व्हिडिओ
Pooja Sawant Engagement Video : अभिनेत्री पूजा सावंत हीचा नुकताच साखरपुडा पार पडला असून तिने तिच्या साखरपुड्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Pooja Sawant Engaged : सध्या मराठी सिनेसृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरु आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके (Sidharth Bodke) यांनी प्रेमाची कबुली दिली. तसेच नुकतच अनेक कलाकार विवाहबंधनात देखील अडकले. प्रथमेश परब (Prathamesh Parab), समीर विध्वंस (Sameer Vidhwans) यांचा साखरपुडा पार पडला. अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हीने सिद्धेश चव्हाण (Siddhesh Chavan) सोबत साखरपुडा करत तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली. दरम्यान तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
आता पूजाने तिच्या साखरपुड्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर तिच्या कलाकार मित्रमंडळाने आणि चाहत्यांनी कमेंट्स करत तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. पूजाच्या साखरपुड्याला तिच्या अनेक कलाकार मित्रांनी देखील हजेरी लावली होती. तिने शेअर केलेल्या फोटोंवरही अनेकांनी कमेंट्स करुन तिला शुभेच्छा दिल्या होत्या. लग्नाच्या मुहूर्ताबद्दल एबीपी माझासोबत काही दिवसांपूर्वी बोलताना (Pooja Sawant on Marriage) पूजा सावंत म्हणालेली,"चव्हाण आणि सावंत हे दोन्ही कुटुंबिय मिळून लग्नाबाबत निर्णय घेतील. सध्या दोन्ही कुटुबियांमध्ये लग्नाबाबत बोलणी सुरू आहे. सिद्धेशला त्याच्या कामातून आणि मला माझ्या प्रोजेक्टमधून वेळ मिळेल त्यावेळी लगेचच आम्ही लग्न करू. उखाणे घेण्यास आता मी सज्ज आहे".
साखरपुड्याचा व्हिडिओ केला शेअर
अभिनेत्री पूजा सावंत हीने तिच्या साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये तिने म्हटलं की, माझा प्रेमावरचा विश्वास उडाला होता. मला वाटलं नव्हतं की मी कधी कुणावर तरी इतकं प्रेम करु शकेन. पण तु आयुष्यात आलास आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलीस. कदाचित तू मला नसतं विचारलंस तर मीच तुला विचारलं असतं. पण आता विचारते माझ्याशी लग्न करशील का? असं एक गोड प्रपोज पूजाने यावेळी केलं आहे.
View this post on Instagram
पूजा सावंत कोण आहे? (Who is Pooja Sawant)
पूजा सावंतने आपल्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तसेच ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) बरोबरही जोडलं गेलं होतं. पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.
पूजा सावंतचा होणार पती कोण? (Who is Pooja Sawant Husband)
पूजा सावंतने जोडीदारासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूजा सावंतचा होणाऱ्या पतीचं नाव सिद्देश चव्हाण (Siddhesh Chavan) आहे. रिपोर्टनुसार, पूजा सावंतचा होणारा पती ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीचा मालक आहे.
ही बातमी वाचा :
Pooja Sawant Engaged : पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा; पहिला फोटो समोर