एक्स्प्लोर

Man Udu Udu Zhaal : इंद्रा-दीपूने घेतला प्रेक्षकांचा निरोप, ‘मन उडू उडू झालं’च्या कथेचा शेवट गोड!

Man Udu Udu Zhaal : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

Mann Udu Udu Zhaal : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zhaal) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. प्रेक्षकांच्या या लाडक्या मालिकेने काल  (13 ऑगस्ट) प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला आहे. शनिवारी मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कथेचा गोड शेवट पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले होते.

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील इंद्रदीप आणि दीपिका अर्थात इंद्रा-दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा शेवटचा भाग चित्रित करण्यात आला होता. यानंतर नुकताच हा भाग प्रदर्शित करण्यात आला आहे.

पाहा प्रोमो :

इंद्रा-दीपूच्या प्रेमकथेने जिंकलं मन

मालिकेच्या सुरुवातीपासूनच या मालिकेचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होते. बँकेत काम करणारी दीपिका आणि त्याच बँकेत वसुलीचं काम पाहणारा इंद्रा यांच्यातील ही प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनाला भावली होती. अनेक आव्हानांचा सामना करत, नकार पचवत त्यांनी आपल्या प्रेमाला यशस्वी केलं. मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात सगळ्यांचा विरोध मावळून अखेर देशपांडे सरांनी इंद्रा आणि दिपूचं लग्न लावून दिलं. मालिकेत प्रेक्षकांना इंद्रा आणि दीपूचा लग्नसोहळा पाहायला मिळाला होता.

'मन उडू उडू झालं' ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने दीपूची भूमिका साकारली होती. तर, अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) याने इंद्राचे पात्र साकारले आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.

'मन उडू उडू झालं'ची जागा घेणार ‘ही’ मालिका

'मन उडू उडू झालं' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून, आता या मालिकेच्या जागी 'तू चाल पुढं' ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. गृहिणीच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही मालिका असून या मालिकेच्या माध्यमातून दीपा परब छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

'तू चाल पुढं' या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची. एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीला देखील त्यांच्या नवीन घरासाठी खारीचा वाटा देण्याची इच्छा असते, हे या प्रोमो मधून झळकते. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब सोबतच ‘तुझ्यात जीव रंगला’मधील वाहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतेय. ‘तू चाल पुढं’ ही मालिका येत्या 15 ऑगस्टपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

संबंधित बातम्या

Man Udu Udu Zhala : कार्तिकचा खेळ खल्लास; पैसे चोरल्याचं सत्य आलं देशपांडे सरांसमोर

Marathi Serial : इंद्रा-दीपू अडकणार लग्नबंधनात, नेहासमोर येणार अविनाशचं सत्य; मराठी मालिकांचा रंगणार एक तासाचा विशेष भाग

महत्त्वाच्या बातम्या

Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
AaiTuljha Bhavani: 'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
Isha Keskar On Marathi Industry: 'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget