Marathi Serial : इंद्रा-दीपू अडकणार लग्नबंधनात, नेहासमोर येणार अविनाशचं सत्य; मराठी मालिकांचा रंगणार एक तासाचा विशेष भाग
Marathi Serial : 'माझी तुझी रेशीमगाठ' आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकांचे आज एक तासाचे विशेष भाग रंगणार आहेत.
Marathi Serial : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) आणि 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) या दोन्ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. आज रविवारी या दोन्ही मालिकांचा एक तासाचा विशेष भाग होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
अविनाशचं सत्य नेहासमोर येणार
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या विशेष भागात अविनाशचं सत्य नेहासमोर येणार आहे. परी नेहमीच ड्रायव्हर काकांचं कौतुक करत असते. त्यामुळे परी नेहाच्या वाढदिवसाचा केक ड्रायव्हर काकांना द्यायचं ठरवते. त्याप्रमाणे नेहाला घेऊन ड्रायव्हर काकांच्या घरी जाते. त्यामुळे ड्रायव्हर काका अविनाश असल्याचे सत्य नेहासमोर येणार आहे. त्यामुळे आता अविनाशचं सत्य नेहा पचवू शकेल का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
इंद्रा-दीपूचा रंगणार विवाहसोहळा
'मन उडू उडू झालं' या मालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून नव-नवे ट्विस्ट येत आहेत. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत सध्या लग्नविशेष भाग पार पडत आहे. मालिकेच्या आजच्या भागात इंद्रा आणि दीपू लग्नबंधनात अडकणार आहेत. दीपूची साळगावकरांच्या घरात मोठी सून म्हणून एन्ट्री होणार आहे.
'मन उडू उडू झालं' जागी 'तू चाल पुढं' होणार सुरू
View this post on Instagram
'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून आता या मालिकेच्या जागी 'तू चाल पुढं' ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. गृहिणीच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही मालिका असून या मालिकेच्या माध्यमातून दीपा परब छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
संबंधित बातम्या