एक्स्प्लोर

Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

Scam 2010 Web Series: छोट्या बचत योजनांमधून उभारलेले आर्थिक साम्राज्य आणि त्यानंतर आलेली सार्वजनिक चौकशी या सर्वांचा मागोवा घेत मालिकेत एक आकर्षक आणि असामान्य प्रवास दाखवला जाणार आहे.

Scam 2010 Web Series: भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रशंसित फ्रँचायझीचा पुढचा अध्याय अधिकृतपणे सुरू झाला आहे. सोनी लिव्ह (Sony LIV), बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट यांनी नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्या दिग्दर्शनाखाली 'स्कॅम 2010' (Scam 2010) चे निर्मितीकार्य सुरू केले आहे. छोट्या बचत योजनांमधून उभारलेले आर्थिक साम्राज्य आणि त्यानंतर आलेली सार्वजनिक चौकशी या सर्वांचा मागोवा घेत मालिकेत एक आकर्षक आणि असामान्य प्रवास दाखवला जाणार आहे.

मालिकेबद्दल बोलताना हंसल मेहता म्हणाले, "स्कॅम 2010' (Scam 2010: The Subrata Roy Saga) ही महत्त्वाकांक्षा, प्रभाव आणि त्यातून येणाऱ्या अहंकाराची कथा आहे. विश्वासावर उभारलेले भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक साम्राज्य कसे तयार झाले, आणि जेव्हा तो विश्वास संपला तेव्हा काय घडले, हे यात दाखवले आहे. साम्राज्याच्या उदयाची आणि त्याला अजेय मानणाऱ्या व्यक्तीची ही रोचक कहाणी आहे..."
 
अपलॉज एंटरटेनमेंटचे चीफ कंटेंट ऑफिसर दीपक सेगल म्हणाले, "स्कॅम आमच्यासाठी केवळ फ्रँचायझी राहिली नाही. स्कॅमच्या यशामुळे आमच्यावर मोठी जबाबदारी आली आहे, कारण प्रेक्षकांच्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. स्कॅम 1992 भारतीय स्ट्रीमिंग इंडस्ट्रीला आपला आवाज मिळत असताना आली आणि ती भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रभावी मालिका ठरली. स्कॅम 1992 च्या यशामुळे आम्हाला अँथॉलॉजी तयार करण्याचा आत्मविश्वास मिळाला, ज्यात महत्त्वाकांक्षा, पैसा, सत्ता आणि मानवी स्वभाव यांचा संघर्ष दाखवला जातो. स्कॅम 2010 मध्ये आम्ही ही महत्त्वाकांक्षा आणखी पुढे नेत आहोत. या सीझनचे विशेष आकर्षण म्हणजे, हंसल मेहता पुन्हा दिग्दर्शन करत आहेत. सुरुवातीपासूनच स्कॅमच्या डीएनएमध्ये हंसल महत्त्वाचे राहिले आहेत आणि गुंतागुंतीच्या वास्तव घटनांना मानवी स्पर्श देऊन रोचक कथा बनवण्याची त्यांची क्षमता ही फ्रँचायझी लोकप्रिय होण्याचे एक मोठे कारण आहे..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मुख्य भूमिकेत सिद्धार्थ बोडके म्हणाले, "या पात्राच्या व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंती आणि शोचा स्केल मला खूप भावला. त्याची आवड, सत्ता, दोष, उदय आणि शेवटी झालेला पतन हे सर्व त्याला साकारण्यासाठी अत्यंत रोचक बनवतात. हा अनुभव माझ्यासाठी रोमांचक ठरला असून, हंसल मेहता यांसारख्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली असा बहुआयामी पात्र साकारण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद झाला..."
 
बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010 सध्या प्रॉडक्शन प्रक्रियेत असून लवकरच सोनी लिव्हवर स्ट्रीम होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
OTT Suspense Thriller Webseries: 6 एपिसोड्सची जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज एकदा पहाच; विक्षिप्त डिटेक्टिव्ह, गुंतागुंतीच्या केसेस; शेवटपर्यंत खिळवणारा थरार
6 एपिसोड्सची जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज एकदा पहाच; विक्षिप्त डिटेक्टिव्ह, गुंतागुंतीच्या केसेस; शेवटपर्यंत खिळवणारा थरार
AaiTuljha Bhavani: 'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
Mrutyuchakra Upcoming Movie: एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?
एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget