He Tar Kahich Nay : मोने असो किंवा नार्वेकर, संजय म्हटलं की किस्से रंगणार, 'हे तर काहीच नाय'च्या मंचावर कल्ला होणार!
He Tar Kahich Nay : गिरीश ओक, अतुल परचुरे, संजय मोने यांच्या सोबतच आगामी भागात अदिती सारंगधर, मनसे नेते संदीप देशपांडे आणि मेघा घाडगे हे कलाकार देखील या मंचावर उपस्थित राहणार आहेत.
He Tar Kahich Nay : 'हे तर काहीच नाय' (He Tar Kahich Nay) या कार्यक्रमातून कलाकार मजेदार किस्से सांगून प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करतात, त्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता बनला आहे. काही कलाकार हे स्वतःच इतके मिश्किल स्वभावाचे असतात की, त्यांच्या सोबत घडलेले किस्से देखील तितकेच धमाल असतात. त्यात आवर्जून उल्लेख करावा असे कलाकार म्हणजे संजय मोने (Sanjay Mone) आणि संजय नार्वेकर (Sanjay Narvekar).
येत्या आठवड्यात ‘हे तर काहीच नाय’च्या मंचावर संजय मोने स्वतः प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहेत. पण, त्यांचे किस्से हे न संपणारे आहेत. त्यामुळे उपस्थित कलाकारांपैकी गिरीश ओक हे देखील संजय मोने यांचे किस्से सांगून सगळ्यांना हसवून लोटपोट करणार आहेत.
गिरीश ओक सांगणार संजय मोनेंचे किस्से
गिरीश ओक आणि संजय मोने हे एकदा बांद्रा वरून माहीमला जात होते, तेव्हा पोलिसांनी त्यांची गाडी थांबवली. त्यावेळी पोलीस आणि मोने यांच्यातील विनोदी संभाषण गिरीश ओक यांनी सांगितलं. तसेच, गिरीश ओक यांच्या नावावर संजय मोने पुण्यातील एक किस्सा नेहमी सगळ्यांना सांगतात, तो किस्सा नेमका कुठला? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
जेव्हा भर ट्राफिकमध्ये संजय नार्वेकर परचुरेंचे डोळे झाकतात...
यावेळी अभिनेते अतुल परचुरे संजय नार्वेकर यांच्यासोबतचे किस्से सांगणार आहेत. अतुल परचुरे आणि संजय नार्वेकर एकदा बाईकवरून जात असताना, संजयने बाईक चालवत असलेल्या अतुलचे डोळे भर ट्रॅफिकमध्ये बंद केले आणि त्यांना बाईक चालवायला सांगितली. पुढे काय झालं? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आगामी भाग पाहायला लागणार आहे.
गिरीश ओक, अतुल परचुरे, संजय मोने यांच्या सोबतच आगामी भागात अदिती सारंगधर, मनसे नेते संदीप देशपांडे आणि मेघा घाडगे हे कलाकार देखील या मंचावर उपस्थित राहणार आहेत. धमाल आणि मनोरंजनाने परिपूर्ण असा हा भाग येत्या शुक्रवारी आणि शनिवारी प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
- Shahrukh khan : किंग इज बॅक! आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुख खानची पहिली पोस्ट
- Naagin 6 Promo : एकता कपूरच्या 'Naagin 6' चा प्रोमो रिलीज, मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- Happy birthday Dolly Bindra : बॉलिवूडमध्ये नेहमीच ‘साईड कॅरेक्टर’, वादांमुळे नेहमीच चर्चेत राहिलीये डॉली बिंद्रा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha