एक्स्प्लोर
Advertisement
झी मराठी पुरस्कारांवर 'काहे दिया परदेस'ची छाप
मुंबई : झी मराठीच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेले झी मराठी पुरस्कार 2016 जाहीर झाले आहेत. काहे दिया परदेस या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिका, नायिका, नायक या मुख्य पुरस्कारांसह 11 पुरस्कार पटकावले आहेत. गौरीची भूमिका साकारणाऱ्या सायली संजीवने नायिका, जोडी, भावंड, लक्षवेधी चेहरा अशा तब्बल चार पुरस्कारांवर नाव कोरलं आहे.
'दिल मराठी धडकन मराठी’ असं ब्रीदवाक्य असलेला हा सोहळा येत्या रविवारी म्हणजे 23 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात काहे दिया परदेसने 11, तर चला हवा येऊ द्याने तीन पुरस्कार पटकावले. माझ्या नवऱ्याची बायको, खुलता कळी खुलेना, जय मल्हार या मालिकांना प्रत्येकी दोन पुरस्कार मिळाले, तर रात्रीस खेळ चाले या मालिकेला एक पुरस्कार मिळाला.
जय मल्हार, खुलता कळी खुलेना, रात्रीस खेळ चाले या मालिकेतील मुख्य कलाकारांनी एकत्रित सादर केलेल्या नृत्याविष्कारांना उपस्थितांची दाद मिळाली. शिव-गौरी, शनाया-गुरु-राधिका, मानसी-विक्रांत या जोड्यांनी केलेले डान्सही प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेले.
झी मराठी अवॉर्ड 2016 चे विजेते
सर्वोत्कृष्ट मालिका - काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट कुटुंब - काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट नायिका - गौरी (काहे दिया परदेस)
सर्वोत्कृष्ट नायक - शिव (काहे दिया परदेस)
सर्वोत्कृष्ट भावंडं - गौरी-नचिकेत (काहे दिया परदेस)
सर्वोत्कृष्ट जोडी - शिव-गौरी (काहे दिया परदेस)
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री - पार्वती आजी (खुलता कळी खुलेना)
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष - पांडू (रात्रीस खेळ चाले)
सर्वोत्कृष्ट आई - राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट वडील - मधुसूदन सावंत (काहे दिया परदेस)
सर्वोत्कृष्ट सासू - आजी - (काहे दिया परदेस)
सर्वोत्कृष्ट सासरे - मधुसूदन सावंत (काहे दिया परदेस)
सर्वोत्कृष्ट सून - गौरी (काहे दिया परदेस)
सर्वोत्कृष्ट खलनायिका - शनाया (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (स्त्री) महालक्ष्मी (जय मल्हार)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) नारद (जय मल्हार)
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत - खुलता कळी खुलेना
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा - भाऊ कदम (चला हवा येऊ द्या)
सर्वोत्कृष्ट सूत्र संचालक - डॉ. निलेश साबळे (चला हवा येऊ द्या)
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम - चला हवा येऊ द्या
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत लक्षवेधी चेहरा - गौरी (काहे दिया परदेस)
कोलगेट मॅक्स फ्रेश फेस ऑफ द इयर- अंजली (तुझ्यात जीव रंगला)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
फॅक्ट चेक
Advertisement