Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : जुने कलाकार का सोडतायत मालिका? निर्माते असित कुमार मोदींनी सांगितलं कारण!
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : एकापाठोपाठ एक अशा अनेक कलाकारांनी मालिकेला गुडबाय म्हटले असून, हे नेमके का घडत आहे? हे प्रेक्षकांना देखील जाणून घ्यायचे आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेने प्रेक्षकांना गेल्या 14 वर्षांपासून हसवले आहे. सध्या देखील ही मालिका प्रचंड चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी मालिका चर्चेत असण्याचं कारण वेगळं आहे. मालिकेतील अनेक कलाकार आता या मालिकेला अलविदा म्हणत आहेत. यामुळे मालिका सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. एकापाठोपाठ एक अशा अनेक कलाकारांनी मालिकेला गुडबाय म्हटले असून, हे नेमके का घडत आहे? हे प्रेक्षकांना देखील जाणून घ्यायचे आहे.
कलाकारांच्या या एक्झिटवर आता निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) आणि आपली प्रतिक्रिया देत याचे कारण सांगितले आहे. नुकतीच मालिकेत नव्या तारक मेहताची (Taarak Mehta) एन्ट्री झाली आहे. आता मालिकेत तारक मेहताच्या भूमिकेत अभिनेता सचिन श्रॉफ दिसत आहे. या आधी तब्बल 14 वर्ष ही भूमिका अभिनेते शैलेश लोढा यांनी साकारली होती. मात्र, काही काळापूर्वी त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली होती.
मलाही वाईट वाटतं!
‘गेली 14 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता आम्ही 15व्या वर्षात पदार्पण केले आहे. या प्रवासात आता आणखी पुढे जाण्यासाठी आम्ही नव्या कल्पना आणि नवीन कथानकांवर काम करत आहोत. आमची संपूर्ण टीम म्हणजे माझं कुटुंब आहे. यातील एकही जण शो सोडून गेलं तर मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं,’ असे या शोचे निर्माते असित कुमार मोदी एका मुलाखतीत म्हणाले.
मालिका का सोडतायत कलाकार?
असित कुमार मोदी याविषयी बोलताना म्हणाले की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका काही डेली सोप नाही. प्रत्येकाच्या आपल्या काही गरजा असतात. मी कुणावरही काहीही आरोप करणार नाही. मी स्वतः देखील त्यांच्या काही गरजा पूर्ण करून शकत नाही. आयुष्यात काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. अशावेळी जर कुणीसकारात्मक दृष्टीकोन ठेवून ही मालिका सोडून जात असेल, तर आपण त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले पाहिजेत.
प्रेक्षकांना लोकप्रिय पात्र परतण्याची प्रतीक्षा!
गेल्या 14 वर्षांच्या प्रवासात अनेक कलाकारांनी मालिका सोडली. तर, ‘नट्टू काका’ साकारणारे घनश्याम नायक, आणि ‘डॉक्टर हाथी’ साकारणारे अभिनेते कवीकुमार आझाद यांना देवाज्ञा झाली. या मालिकेत ‘दया बेन’ साकारणाऱ्या दिशा वाकाणीने आई झाल्यानंतर या मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र, अद्याप ती मालिकेत परतलेली नाही. तर, आता ‘टप्पू’ साकारणाऱ्या राज अंदकतने देखील मालिकेला रामराम ठोकला आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
