(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठमोळी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; पेशवाई थाटात शाही विवाहसोहळा
नुकताच मराठी मालिका आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री वेदांगी कुलकर्णीचा विवाहसोहळा पार पडला.
Vedangi Kulkarni : सध्या अनेक सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. नुकताच मराठी मालिका आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री वेदांगी कुलकर्णीचा (Vedangi Kulkarni) विवाहसोहळा पार पडला. वेदांगीने तिच्या या पेशवाई थाटातील विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वेदांगीने 20 नोव्हेंबर 2021 रोजी अभिषेक तिळगुळकर (Abhishek Tilgulkar) सोबत लग्नगाठ बांधली आहे. 9 मार्च 2021 रोजी वेदांगी आणि अभिषेकचा साखरपुडा पार पडला होता.
वेदांगीने तिच्या शाही लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला वेदांगीने कॅप्शन दिले, 'लग्नसोहळ्याचे काही खास क्षण' वेदांगीने प्री-वेडिंग फोटोशूटचे आणि संगीत सोहळ्याचे फोटो देखील शेअर केले आहेत. तिच्या सूर राहू दे आणि साथ दे तू मला या मालिकेमधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. लंडनच्या आजीबाई, छडा, बिलिव्ह इन आणि लौट आओ गौरी या नाटकांमध्ये वेदांगीने प्रमुख भूमिका साकारली. वेदांगीने 'डान्स महाराष्ट्र डान्स' या शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. या शोमधील वेदांगीच्या नृत्यशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
View this post on Instagram
Atrangi Re Trailer : Akshay Kumar, Sara Ali Khan आणि Dhanush च्या आगामी सिनेमाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
वेदांगी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Actress Childhood Photo : 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या आहे बॉलिवूडची 'एंटरटेन्मेंट क्विन'