Marathi Serial : मालिकांमध्ये जल्लोषात साजरी होणार वटपौर्णिमा; होणार विशेष भाग
Marathi Serial : मराठी मालिकांमध्ये वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार आहे.
Marathi Serial : वरुणराजाचं आगमन झालं की तमाम स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा या सणाची. वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. आता मराठी मालिकांमध्ये वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार आहे.
स्वाभिमान मालिकेतील पल्लवी, आई कुठे काय करते मालिकेतील संजना आणि अनघा, ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू, मुरांबा मालिकेतील रमा, पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकी आणि अबोली यंदा पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. या खास सणासाठी सगळ्याच नायिकांनी जय्यत तयारी केली असून या सगळ्यांचा पारंपरिक लूक लक्ष वेधणारा आहे. पिंकी तर हटके अंदाजात वटपौर्णिमा साजरी करणार आहे. खरतर तिने वटपौर्णिमेचं व्रत करु नये म्हणून युवराजच्या आईने खूप प्रयत्न केले आहेत. पण हार मानेल ती पिंकी कसली युवराजसकट त्याच्या गाडीलाच पिंकी फेरे मारुन व्रत पूर्ण करणार आहे.
रंग माझा वेगळा मालिकेत दीपा आणि कार्तिकचं नातं निर्णायक वळणावर आहे. कार्तिकीला कार्तिकच आपले बाबा आहेत हे सत्य कळलं आहे. त्यामुळे आई बाबांनी एकत्र यावं असं तिला मनोमन वाटतंय. आपल्या आईने बाबांसाठी वटपौर्णिमेचं व्रत करावं अशी कार्तिकीची इच्छा आहे. तर तिकडे ऐन वाटपौर्णिमेच्या दिवशी कार्तिकच्या अटकेसाठी पोलीस हजर झालेत. कार्तिकवरचं हे संकट दूर व्हावं यासाठी दीपा वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे.
फुलाला सुगंध मातीचा मालिकेतही कीर्तीने शुभमसाठी वटपौर्णिमेचं व्रत केलं आहे. कर्तव्य आणि घरच्या जबाबदाऱ्या अशी कसोटी पार करत कीर्ती आपलं स्वप्न पूर्ण करत आहे. शुभमचा भक्कम पाठिंबा असल्यामुळेच कीर्ती आपलं ध्येय गाठू शकतेय. त्यामुळे कीर्ती-शुभमसाठी यंदाची वटपौर्णिमा खास आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप-गौरीसाठीही वटपौर्णिमा खास ठरणार आहे. दोघांमधले गैरसमज दूर झालेत. त्यामुळे गौरीही जयदीपासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे, सहकुटुंब सहपरिवारमध्येही वटपौर्णिमेचा जल्लोष पाहायला मिळेल. हे वटपौर्णिमा विशेष भाग प्रेक्षकांना 14 जूनला पाहायला मिळणार आहेत.
संबंधित बातम्या