एक्स्प्लोर

Tujhech Mi Geet Gaat Aahe : 12 वर्षानंतर उर्मिला कोठारेचं छोट्या पडद्यावर कमबॅक; 'तुझेच मी गीत गात आहे...' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) तब्बल 12 वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे.

Tujhech Mi Geet Gaat Aahe : महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थातच स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. दर्जेदार संहिता, दमदार कलाकारांची फौज आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन यामुळेच स्टार प्रवाहवरील मालिकांमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग बनली आहेत. स्टार प्रवाहच्या या परिवारात लवकरच आणखी एका नव्या मालिकेचं कुटुंब सामील होणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे तुझेच मी गीत गात आहे (Tujhech Mi Geet Gaat Aahe) . गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) तब्बल 12 वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे.तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना ऊर्मिला म्हणाली, खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहसोबत आणि अर्थातच स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांच्यासोबत खूप जुनं नातं आहे. वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येतेय. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे. 

स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका मी आवर्जून पहाते. नायिका म्हणून या प्रवाहात आता मी देखिल सामील होणार आहे त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका तुझेच मी गीत गात आहे 2 मे पासून रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget