एक्स्प्लोर

Youtuber Adnaan Shaikh On Wife Wearing Hijab Burqa: स्वतः मुस्लिम, मराठमोळ्या मुलीशी लग्न; आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो प्रसिद्ध युट्यूबर; म्हणाला, 'पुरूषांची नजर...'

Youtuber Adnaan Shaikh On Wife Wearing Hijab Burqa: युट्यूबर अदनान शेखची मराठमोळी पत्नी, जिनं हिंदू धर्मातून इस्लामचा स्वीकार केला आहे, ती आता सतत बुरखा आणि हिजाब परिधान करते. ती कधीच तिचा चेहरा दाखवत नाही.

Youtuber Adnaan Shaikh On Wife Wearing Hijab Burqa: प्रसिद्ध युट्यूबर (Youtuber) आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) अदनान शेख (Adnaan Shaikh) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. युट्यूबर अदनान शेखनं (Youtuber Adnaan Shaikh) 2024 मध्ये गर्लफ्रेंड रिद्धी जाधवसोबत लग्न केलेलं. मीडिया रिपोर्टनुसार, अदनानची गर्लफ्रेंड मराठी असून तिनं अदनानसोबत लग्न करण्यापूर्वी आपला धर्म बदलला होता. याबाबत एका मुलाखतीत बोलताना अदनानंही सांगितलेलं. रिद्धीनं धर्मासोबतच आपलं नावही बदललं होतं, तिनं आपलं नाव 'आएशा', असं ठेवलेलं. अदनानशी लग्न झाल्यापासून ती कायम बुरख्यात दिसते. यावरुन अनेकदा युट्यूबरला जोरदार ट्रोल करण्यात आलेलं. अशातच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना अदनाननं यावर मौन सोडलं आहे. तसेच, त्याला ट्रोल करणाऱ्यांना त्यानं सुनावलंही आहे.  

पत्नीला बुरख्यात ठेवण्याबाबत युट्यूबर अदनान शेख काय म्हणाला? 

युट्यूबर अदनान शेखची मराठमोळी पत्नी, जिनं हिंदू धर्मातून इस्लामचा स्वीकार केला आहे, ती आता सतत बुरखा आणि हिजाब परिधान करते. ती कधीच तिचा चेहरा दाखवत नाही. अगदी अदनानसोबत ज्यावेळी तिनं आपली लग्नगाठ बांधली, त्यावेळी संपूर्ण विवाह सोहळ्यादरम्यानही तिनं आपला चेहरा कोणालाही दाखवला नाही. यावरुन युट्यूबरला अनेकदा ट्रोल करण्यात आलंय. अशातच एका मुलाखतीत बोलताना अदनान शेखनं यावर मौन सोडलं आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Adnaan Shaikh (@adnaan_07dz)

'लेट्स टॉक विथ नमिता'शी बोलताना अदनान शेख याला पत्नीला बुरखा घालण्यासाठी सक्ती करण्यात आली का? असा प्रश्न विचारण्यात आलेला. यावर उत्तर देताना अदनान शेख म्हणाला की, "त्यानं आपल्या पत्नीवर हिजाब परिधान करण्याची सक्ती केली होती का? यावर उत्तर देताना अदनाननं स्पष्टीकरण दिलंय. तो म्हणाला की, "लोकांना जे बोलायचं आहे, ते बोलू द्या... हे माझं आयुष्य आहे आणि मी ते माझ्या स्वतःच्या अटींवरच जगतो... ज्यांना या गोष्टीचा आक्षेप आहे, त्यांनी खुशाल त्यांना जे वाटतंय ते करावं, पण माझ्यापुरतं बोलायचं तर, जे लोक आपल्या पत्नींना 'पर्दा'मध्ये ठेवत नाहीत, त्यांना 'जन्नत' (स्वर्ग) प्राप्त होणार नाही, असे मी मानतो. मी मात्र माझ्या पत्नीला लोकांसमोर 'प्रदर्शित' करणार नाही. मी एक पुरुष आहे आणि इतर पुरुष स्त्रियांकडे कोणत्या नजरेनं पाहतात, हे मला चांगलंच ठाऊक आहे..."

अदनान शेख म्हणाला की, "आजच्या काळात लोक आपल्या पत्नीला आणि आईला प्रदर्शनाची वस्तू समजतात... अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास प्रवृत्त करतात... प्रत्येकाचं आयुष्य स्वतंत्र असतं आणि मृत्यूनंतर आपल्याला आपल्या कर्माचा हिशोब द्यावा लागणार आहे... मी माझे व्यवहार धर्माच्या चौकटीत राहून अत्यंत जबाबदारीनं पार पाडतोय..."

"आमच्या धर्मात असंही सांगितलं गेलंय की, पुरुष ज्या दृष्टीनं स्त्रियांकडे पाहतात, ती दृष्टी जर स्त्रियांना उमजली, तर त्या स्वतःला पूर्णपणे झाकून घेतल्याशिवाय घराबाहेर पाऊलही टाकणार नाहीत. श्रद्धा आणि ऐहिक जीवन या दोन्हीमध्ये समतोल राखण्याचा मी प्रयत्न करतोय...", असं अदनान शेख म्हणाला. 

अदनाननं धर्मांतरासाठी पत्नीवर जबरदस्ती केली?

अदनान शेख त्याच्या लग्नापासूनच जोरदार ट्रोल होतोय. त्यानं एका मराठी मुलीशी आपली लग्नगाठ बांधलीय. अदनान शेखनं आपल्या पत्नीच्या धर्मांतराच्या चर्चांवरही काही दिवसांपूर्वी मौन सोडलेलं. अदनान शेख म्हणालेला की, त्यांच्या विवाहापूर्वीच त्याच्या पत्नीनं आपला धर्म बदलेला. भारतात प्रत्येकालाच स्वातंत्र्याचा अधिकार आहे, कोणालाही त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही. इथे हे नमूद करणं महत्त्वाचं आहे की, अदनानच्या पत्नीचं मूळ नाव 'रिद्धी' असं आहे, दरम्यान, लग्नाच्या वेळी तिनं धर्मांतर केलं आणि 'आएशा' हे नाव धारण केलं. लग्नानंतर ती सगळीकडे बुरख्यातच दिसते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'हिंदू बहुत डरपोक कौम है…', 'धुरंधर 2'च्या डायलॉगवर भडकले प्रेक्षक, अभिनेत्याला जीवेमारण्याच्या धमक्या; जीव तोडून सांगतोय, 'अरे मी हिंदू...'

महत्त्वाच्या बातम्या

5 मराठी चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर! अमेरिकेतील NAFA फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी
5 मराठी चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर! अमेरिकेतील NAFA फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
'अल्फा' फेम शर्वरी वाघची ही वेबसीरिज पाहिलीत का? 5 एपिसोडची सिरीज पुन्हा चर्चेत; कुठे पहाल?
'अल्फा' फेम शर्वरी वाघची ही वेबसीरिज पाहिलीत का? 5 एपिसोडची सिरीज पुन्हा चर्चेत; कुठे पहाल?
इंद्रजाल'वरून वाद पेटला; प्रदर्शनाआधी गदारोळ होताच दिग्दर्शकांनीच सोडलं मौन, म्हणाले...
इंद्रजाल'वरून वाद पेटला; प्रदर्शनाआधी गदारोळ होताच दिग्दर्शकांनीच सोडलं मौन, म्हणाले...

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget