Urfi Javed : चक्क फुलांपासून तयार केली बिकिनी, उर्फी जावेदच्या हटके स्टाईलची सोशल मीडियावर चर्चा! पाहा व्हिडीओ
Urfi Javed : आपले बोल्ड कपडे आणि हटके स्टाईलने लोकांना घायाळ करणारी उर्फी जावेद नुकतीच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आजकाल सोशल मीडियावर आपल्या हटके स्टाईलमुळे सतत चर्चेत असते. उर्फीचे नाव घेताच तिचे तिच्या चित्रविचित्र स्टाईल्स डोळ्यांसमोर येऊ लागतात. आपले बोल्ड कपडे आणि हटके स्टाईलने लोकांना घायाळ करणारी उर्फी जावेद नुकतीच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती फ्लोरल प्रिंट बिकिनीमध्ये नाही, तर चक्क फ्लॉवर बिकिनी लूकमध्ये दिसली, जे पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर येऊन अवघे काहीच तास उलटले असून, हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
यावेळी तिने कपड्यांऐवजी चक्क फुलांनी बिकिनी तयार केली असून, ती परिधान करून उर्फी सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांकडून वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदची ही स्टाईल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले असून, चाहते आपापल्या खास शैलीत या लूकवर कमेंट करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
हटके ड्रेसमुळे उर्फी झाली ट्रोल
उर्फी सतत सोशल मीडियावर आपला हटके लूक शेअर करत असते. मात्र, यावेळीही उर्फी जावेदचा हा लूक सोशल मीडियावर यूजर्सना आवडलेला नाही. या लूकमुळे उर्फीला अनेकांनी ट्रोल केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, 'कृपया शाकाहारी प्राण्यांपासून (गाय, म्हैस, शेळी, हरिण, हत्ती) दूर रहा.' दुसऱ्या एक्का वापरकर्त्याने लिहिले की, 'दीदी बकरीपासून दूर राहा.' अशीच कमेंट करत एका युजरने लिहिले की, 'लोकांकडे दुर्लक्ष करणे आणि आत्मविश्वासाने बोल्ड लूक दाखवणे, हे धाडसी कृत्य आहे.' उर्फी जावेदच्या या लूकवर अनेकांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.
आपल्या कपड्यांमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद लाईमलाईटमध्ये येण्याची एकही संधी सोडत नाही. पुन्हा एकदा उर्फीने तिच्या बेधडक शैलीने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवले आहे. उर्फी जावेद 40 ते 55 लाखांच्या संपत्तीची मालकीण आहे. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 25 ते 35 हजार मानधन घेते. अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. ‘दुर्गा’, ‘सात फेरों की हेराफेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘पंच बीट सीजन 2’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे.
हेही वाचा :