![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Urfi Javed : अतरंगी ड्रेसिंग सेन्स अन् लग्झरी लाईफस्टाईल ; उर्फी जावेद आहे लाखोंच्या संपत्तीची मालकीन
उर्फीनं (Urfi Javed) अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत...
![Urfi Javed : अतरंगी ड्रेसिंग सेन्स अन् लग्झरी लाईफस्टाईल ; उर्फी जावेद आहे लाखोंच्या संपत्तीची मालकीन urfi javed net worth in lakhs know about her lifestyle Urfi Javed : अतरंगी ड्रेसिंग सेन्स अन् लग्झरी लाईफस्टाईल ; उर्फी जावेद आहे लाखोंच्या संपत्तीची मालकीन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/05/44de565f01b1da8ea8a1fde86f2209d2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या अतरंगी फॅशन्स सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. बिग बॉस ओटीटीमुळे उर्फीला विशेष लोकप्रियता मिळाली. तिच्या एअरपोर्ट लूकची देखील चर्चा सोशळ मीडियावर होते. अनेक वेळा उर्फीला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. उर्फीचा जन्म 15 ऑक्टोबर 1996 रोजी झाला. 2016 साली तिनं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. उर्फीनं अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत...
रिपोर्टनुसार, उर्फी 40 ते 55 लाखांची संपत्तीची मालकीन आहे. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 25 ते 35 हजार मानधन घेते. अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे.
View this post on Instagram
उर्फीला इन्स्टाग्रामवर 2.8 मिलियन नेटकरी फॉलो करतात. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. एका मुलाखतीमध्ये उर्फीनं सांगितलं की, 'मला कोणी काम देत नाही, तसेच माझ्याकडे देखील पैसे नाहित. '
संबंधित बातम्या
- Sri lanka Curfew : श्रीलंकेत 36 तासांचा कर्फ्यू हटवला, नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार, पंतप्रधान करणार संबोधित
- ...तर आपलीही अवस्था श्रीलंकेसारखी होईल, पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त
- आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेत निदर्शने, कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी 600 पेक्षा जास्त जणांना अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)