एक्स्प्लोर

Karan Mehra-Nisha Rawal : जॉनी-एम्बरप्रमाणे आमच्या घटस्फोटाचं लाईव्ह स्ट्रिमिंग करा; टीव्ही अभिनेत्याची अजब इच्छा!

Karan Mehra-Nisha Rawal : अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) गेल्या काही काळापासून त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

Karan Mehra-Nisha Rawal : अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) गेल्या काही काळापासून त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. टीव्ही अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल (Nisha Rawal) यांच्या दरम्यान सुरू असलेले वाद आता सर्वश्रुत आहेत. मात्र, या सगळ्या दरम्यान, आता करण मेहराने एक अजब मागणी केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत करण मेहराने म्हटले की, हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्याप्रमाणे त्यांचा घटस्फोट देखील जगभरात थेट प्रसारित व्हावा. अभिनेत्याने आपला खटला लाईव्ह स्ट्रिमिंग व्हावा, अशी इच्छा  जाहीर केली आहे.

जॉनी डेप आणि एम्बर हर्ड प्रकरणात अभिनेता जॉनी डेप हा खटला जिंकला होता. या खटल्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग जगभरातून पाहिलं गेलं अशा परिस्थितीत हे प्रकरण लाईव्ह स्ट्रिमिंग व्हावे, अशीही करणची इच्छा आहे.

घटस्फोटानंतर चर्चेत आली जोडी

लोकप्रिय टीव्ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये ‘नैतिक’ची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेला अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) आणि त्याची पत्नी निशा रावल (Nisha Rawal) यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरु आहेत. दरम्यान, करण मेहराने निशावर विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप केले होते. तर, निशाने देखील पत्रकार परिषद घेत पूर्वपती करण मेहरावरच अनेक आरोप लावले होते.

मुलाच्या कस्टडीवरून वाद सुरु

निशा रावल आपल्याला आपल्या मुलाला भेटू देत नसल्याचा आरोप करण मेहराने (Karan Mehra) केला होता. मात्र, त्यावर उत्तर देताना निशा म्हणाली, ‘जर त्याने आपल्या मुलाला भेटण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्याला कोण रोखणार आहे? आम्ही दोनवेळा समुपदेशन सत्रे केली आणि डॉक्टरांनी त्याला विचारले की, तुम्हाला तुमच्या मुलाला भेटण्याची इच्छा आहे का? पण त्यालाच मुलाला भेटायचे नाही. तो म्हणतो की, त्याला पूर्ण कस्टडी हवी आहे. मात्र, यावेळी तो आपल्याकडे काम नसल्याची कबुली देखील देत आहे. अशा परिस्थितीत, तो मुलाची काळजी कशी घेईल? त्याला फक्त आपल्या अहंकारासाठी मुलाचा वापर करायचा आहे.’

मुलाच्या ताब्याबाबत दोघांमध्ये कायदेशीर लढाई

गेल्या वर्षी निशाने पती करणवर अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला, तेव्हा या जोडप्यामधील भांडण समोर आले होते. दोघांमधील संबंध इतके बिघडले होते की, निशाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तसेच, दोघेही आपला मुलगा कविशचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर लढा देत आहेत. निशाने करणवर आरोप करत केस दाखल केली होती. तिने पतीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोपही लावला होता. ज्यावर प्रतिक्रिया देताना करणने हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. दोघांनी गेल्या वर्षी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला असून, मुलाच्या ताब्याबाबत दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. करण-निशा यांनी 2012मध्ये प्रेमविवाह केला होता.

हेही वाचा :

टीव्ही अभिनेता करण मेहरा वादाच्या भोवऱ्यात; पत्नी निशा रावलचा करणवर फसवणुकीचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Embed widget