Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराजने मंजुळासोबत काढला सेल्फी; 'तुझेच मी गीत गात आहे’ चा प्रोमो व्हायरल
तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराज हा मंजुळासोबत सेल्फी काढतो.
Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाल्यानं आता मालिकेत रंजक वळणावर आलेलं बघायला मिळत आहे. या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराज हा मंजुळासोबत सेल्फी काढतो.
तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या सुरुवातीला दिसत आहे की, मोनिका ही पिहूचे वाद्यांसोबत फोटो काढत आहे. तेवढ्यात मल्हार तिथे येतो आणि पिहूला विचारतो,'तू हे काय करत आहेस?' यावर पिहू म्हणते, 'आम्ही फोटो काढत आहोत.' मल्हार पिहूला म्हणतो,'पण तुला ही वाद्य वाजवता येतात का? जे तुझ्यात टॅलेंट आहे तेच तू जगासमोर दाखवलं पाहिजे.'
त्यानंतर प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा आणि स्वरा उर्फ स्वराज हे दोघे बोलत असतात. स्वराज हा मंजुळासोबत सेल्फी काढतो. सेल्फी काढताना मंजुळा डोक्यावर पदर घेते. सेल्फीमध्ये मंजुळाचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे स्वराज म्हणतो, 'मी सेल्फी सोशल मीडियावर टाकणार नाही.' तरी देखील मंजुळा ही स्वराजला सेल्फी काढायला नकार देते. त्यानंतर स्वराज नाराज होतो. स्वराजला नाराज झालेलं पाहून मंजुळाला वाईट वाटतं. त्यानंतर मंजुळा ही स्वराजसोबत सेल्फी काढायला तयार होते.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काही महिन्यांपूर्वी वैदेहीचा मृत्यू झाला. वैदेही ही मल्हारची पहिली पत्नी आणि स्वरा ऊर्फ स्वराज आई होती. वैदेहीच्या मृत्यूनंतर आता वैदेही सारख्या दिसणाऱ्या मंजुळाची काही दिवसांपूर्वी मालिकेत एन्ट्री झाली आहे.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो. तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरनं साकरली होती. आता ऊर्मिला ही या मालिकेतील मंजुळा ही भूमिका साकारत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: