Marathi Serial : आधी अक्षराचा विश्वासघात केला, आता भुवनेश्वरीसोबत लग्न करण्यासाठी चारुहाससमोर जोडणार हात , अधिपती पुन्हा एकदा तीच चूक करणार?
Tula Shikvin Changlach Dhada : भुवनेश्वरीसोबत लग्न करण्यासाठी अधिपती चारुहाससमोर हात जोडल्याचं पाहायला मिळतं.
Tula Shikvin Changlach Dhada : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. त्यातच आता भुवनेश्वरीच चारुलता म्हणून वावरत होती हे देखील अक्षराने सगळ्यांसमोर आणलंय. पण या सगळ्यात अधिपती देखील सामील असतो हा सगळ्यात मोठा धक्का अक्षराला बसतो. त्यानंतर आता अधिपती भुवनेश्वरीसोबतच लग्न करण्यासाठी चाहरुहासला तयार करण्याचे प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय.
भुवनेश्वरी इतके दिवस चारुलता म्हणून वावरत होती. तिच्यावर घरातल्या सगळ्यांनीही विश्वास ठेवला होता. पण अखेरीस भुवनेश्वरीचं सत्य अक्षरा उघड करते. त्याचवेळी तिला अधिपतीकडूनही विश्वासघात झाल्याचं समजतं. त्यामुळे भुवनेश्वरीचं सत्य समोर आल्यावरही चारुहास भुवनेश्वरीसोबत लग्न करणार का याची उत्सुकता आहे.
नवा प्रोमो समोर
मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अधिपती चारुहासला म्हणतो की, जे झालं ते झालं..चूकभुल माफ करुयात..तुमच्यासाठी नाही त्यांच्यासाठी नाही माझ्यासाठी तरी...तुमच्या मुलासाठी तरी तुम्ही लग्न करायला होकार द्या आणि लग्नासाठी उभं राहा...एवढं कराल का तुम्ही माझ्यसाठी? असं बोलून अधितपची चारुहास समोर हात जोडतो. त्यामुळे आता चारुहास काय करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अधिपतीकडून अक्षराचा विश्वासघात
भुवनेश्वरीने केलेल्या फसवणुकीवरुन अक्षरा अधिपतीला म्हणते की, तुमच्या अपराधी आहेत त्या..गुन्हा केलाय त्यांनी..तुमची फसवणुक झालीये... मुलगा मानतात त्या तुम्हाला मग त्यांनी तुम्हाला विश्वासात घेतलं का? त्यावर अधितपती अक्षराला म्हणतो की, त्यांनी त्यांच्या डोक्यातला विचार मला बोलून दाखवला होता...फसवणुकीचा गुन्हा तुम्हाला दाखल करायचा असेल तर आमच्या दोघांवर तो गुन्हा दाखल करा...त्यांच्या एकट्यावर नाही...गुन्हेगार फक्त त्या नाही आम्ही पण आहोत...
तगडी स्टारकास्ट असलेली मालिका
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचं स्टारकास्ट खूपच तगडं आहे. हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तर कविता लाड-मेढेकर आणि विजय गोखले मध्यवर्ती भूमिकेत आहेत. मधुगंधा कुलकर्णी यांनी या मालिकेचं लेखन केलं असून शर्मिष्ठा राऊतने या मालिकेची निर्मिती केली आहे.
View this post on Instagram