Thoda Tuza Ani Thoda Maza : 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत लगीनघाई, बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसीचा मोठा निर्णय
Thoda Tuza Ani Thoda Maza : स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत लगीनघाई सुरु झाली आहे. बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
![Thoda Tuza Ani Thoda Maza : 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत लगीनघाई, बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसीचा मोठा निर्णय Thoda Tuza Ani Thoda Maza TV Serial Mansi s big decision to fulfill her father s dream going to marry ranjeet marathi news Thoda Tuza Ani Thoda Maza : 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत लगीनघाई, बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसीचा मोठा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/31/1697812a032a220b220c3df8def14b1c1722440595295322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : 'तुझं आणि थोडं माझं' (Thoda Tuza Ani Thoda Maza) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील भूमिका आता प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवताना दिसत आहे. यामुळे मालिकेत पुढे काय होणार, याची आतुरता सगळ्यांनाच लागली आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळत आहे. नात्यांची हळुवार गोष्ट उलगडणाऱ्या या लोकप्रिय मालिकेत मानसीच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे.
थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत लगीनघाई
खरंतर आपल्या मुलीने शिकून स्वावलंबी व्हावं, तिचं चांगल्या घरात लग्न व्हावं हे प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. मानसीच्या बाबांनीही आपल्या मुलींसाठी खूप स्वप्न पाहिली आहेत. वीट भट्टीतला कामगार ते वीटभट्टीचा मालक हा संघर्ष मानसीच्या बाबांनी अनुभवला आहे. त्यामुळे आपण जे भोगलं ते आपल्या मुलींच्या वाट्याला येऊ नये, असं त्यांना वाटतं. म्हणूनच आपल्यापेक्षाही श्रीमंत असलेलं खानदानी स्थळ त्यांनी मानसीसाठी शोधलं आहे. आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसी रणजीतसोबत लग्न करण्यास तयार झाली आहे.
View this post on Instagram
बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसीचा मोठा निर्णय
मानसीने आजवर स्वत:च्या आनंदाचा कधीही विचार केला नाही. इतरांच्या आनंदासाठी आपण मन मारुन जगतोय, हेही तिच्या लक्षात येत नाही. वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हेचं मानसीचं ध्येय आहे. तिने स्वत:साठी कधी स्वप्नं पाहिलेलच नाही. त्यामुळेच प्रेम काय लग्नानंतरही होईल, असं तिचं मत आहे. मानसीने लग्न करण्याचा घेतलेला हा निर्णय तिच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देणार आहे. कसा असेल मानसीचा यापुढील प्रवास हे जाणून घ्यायचं असेल तर मालिका पाहावी लागेल.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nikki Tamboli : "तंगड्या वर करुन कॅमेऱ्यासमोर झोपते", निक्कीकडून वर्षा उसगांवकरांचा अपमान; रितेश काय भूमिका घेणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)