Thipkyanchi Rangoli : ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अपूर्वा आणि शशांकचा विवाह सोहळा; लग्नसोहळ्याला स्टार प्रवाह कुुटुंब लावणार हजेरी
नुकताच 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) या मालिकेने 100 भागांचा टप्पाही पूर्ण केला आहे.
Thipkyanchi Rangoli : स्टार प्रवाहवरील 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) मालिकेत मालिकेत सुरु आहे शशांक आणि अपूर्वाच्या लग्नाची धामधूम. कानेटकर आणि वर्तक कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून या लग्नसोहळ्यात स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार उपस्थित रहाणार आहे. लग्नसोहळा म्हंटल की आपल्या परिवाराशिवाय तो पूर्णच होत नाही. त्यामुळेच या खास सोहळ्यात स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. केळवण, मेहेंदी आणि हळद थाटात पार पडल्यानंतर आता लग्नाचा शाही थाट अनुभवण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. नुकताच या मालिकेने 100 भागांचा टप्पाही पूर्ण केला आहे.
View this post on Instagram
जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा. दोघांचे स्वभाव परस्परविरोधी असले तरी दोघांना एकत्र जोडून ठेवणारा दुवा म्हणजे कुटुंबावरचं प्रेम. याच कुटुंबावरच्या प्रेमाने दोघांना एकत्र यायला भाग पाडलं आहे. लग्न म्हणजे दोन मनांचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं. एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व अधोरेखित करणाऱ्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतला हा विवाहसोहळा फक्त वर्तक आणि कानेटकर परिवारच नाही तर संपूर्ण प्रवाह परिवार साजरा करणारा आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ठिपक्यांची रांगोळी रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
बहुचर्चित 'Shark Tank'शोचे परिक्षक कोट्यावधींच्या कंपन्यांचे मालक; पाहा कोण आहेत?
The Kapil Sharma Show : अक्षयनं घेतला कपिलचा आशीर्वाद? कपिलनं सांगितला फोटो मागील किस्सा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha