(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तारक मेहताचा 'टप्पू' लग्नबंधनात अडकणार? अभिनेत्याने 'बबीता जी'सोबतच्या नात्यावर मौन सौडलं
Raj Anadkat & Munmun Dutta Relationship Rumours : तारक मेहता फेम अभिनेता राज अनादकटने मुनमुन दत्तासोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवर मौन सोडलं आहे.
Raj Anadkat On Marriage Rumours : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेकडून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. याच मालिकेतून घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे अभिनेता राज अनादकट. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये राजने टप्पूटची भूमिका साकरली होती. या भू्मिकेचा प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. राज ने 2022 मध्ये तारक मेहता मालिका सोडली. आता राज अनादकट उर्फ 'टप्पू'च्या लग्नाच्या बातम्या व्हायरल होत आहे. याआधी 'टप्पू' राज आणि 'बबीता जी'ची भूमिका साकारणारी मुनमून दत्ता यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची बातमी समोर आली होती.
तारक मेहताचा 'टप्पू' लग्नबंधनात अडकणार?
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील टप्पूची भूमिका साकारलेला अभिनेता राज अनादकट याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. राजने अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं आहे की, त्याची आई त्याचं लग्न करण्यासाठी मागे लागली आहे. पण, त्याचा लग्नाचा सध्या कोणताही विचार नाही. यासोबतच अभिनेता राज अनादकटने मुनमुन दत्तासोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवरही मौन सोडलं आहे.
अभिनेत्याने 'बबीता जी'सोबतच्या नात्यावर मौन सौडलं
अभिनेता राज अनादकटने तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडली तेव्हा मुनमुन आणि त्याच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु होती. राजने मुनमुनसोबतच्या रिलेशनशिपमुळे मालिका सोडल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर काहील महिन्यांपूर्वी दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. यावर राज अनादकटने स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
मुनमुन दत्तासोबत रिलेशनशिपच्या अफवांवर काय म्हणाला 'टप्पू'?
राज अनाटकटने मुनमुन दत्ताबाबत बोलण्यास नकार दिला. यावेळी राज म्हणाला की, "मी आणि मुनमुन या विषयावर मला काहीही बोलायचं नाहीय. मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. मी कधीही त्यांच्याबद्दल कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. सध्या मला माझ्या करियरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. माझ्याकडो बोलण्यासाठी इतर अनेक विषय आहे. मी जेव्हा लग्न करेन, तेव्हा सर्वांना माझ्या पर्सनल लाईफबद्दल समजेल".
महत्त्वाच्या इतर बातम्या :