एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Beed : महाराष्ट्रावर अन्याय, PM यांचे बिहारवर जास्त प्रेम? ठाकरेंचा सवाल
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकरी आणि सरकार यावर तीव्र भाष्य केले आहे. राज्यातील शेतकरी आपत्तीत असताना मुख्यमंत्री बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. 'आपले पंतप्रधान, पंतप्रधानाचं सगळ्या राज्यांवरचे प्रेम आहे, लेकिन अंदर की बात मैं बताता हूं, प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है,' असे मुख्यमंत्री बिहारमध्ये म्हणाल्याचा दावा ठाकरेंनी केला. हा महाराष्ट्रासोबत भेदभाव असून महाराष्ट्र तुमचे सावत्र पोर आहे का, असा संतप्त सवाल ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. तुमच्यातील मतभेद विसरून या दगाबाज सरकारला धडा शिकवण्यासाठी एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले. आमचे सरकार असते, तर तुमच्या डोळ्यात आसू येऊ दिले नसते, असेही ते म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















