Munmun Dutta: तारक मेहता का उल्टा चष्मामधील 'बबिता'चा अपघात; पोस्ट शेअर करत दिली माहिती
जर्मनीमध्ये मुनमुनचा (Munmun Dutta) अपघात झाला आहे. नुकतीच मुनमुननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन अपघाताबाबत माहिती दिली.

Munmun Dutta: अभिनेत्री अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील मुनमुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत मुनमुन 'बबिता जी' ही भूमिका साकारते. सध्या मुनमुन ही जर्मनीमध्ये आहे. जर्मनीमध्ये मुनमुनचा अपघात झाला आहे. नुकतीच मुनमुननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन अपघाताबाबत माहिती दिली.
मुनमुनची पोस्ट
मुनमुननं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिनं लिहिलं, 'माझा जर्मनीत एक छोटासा अपघात झाला. माझा डावा गुडघा खूप दुखत होता. त्यामुळे मला माझी ट्रिप इथेच संपवून घरी परत यावे लागेल'. ट्रॅव्हल प्रेमी मुनमुन दत्ता ही एक आठवड्यापूर्वी युरोप ट्रीपला गेली होती. त्यानंतर तिने स्वित्झर्लंड आणि जर्मनीला भेट दिली आहे. पण जर्मनीमध्ये मुनमुनचा अपघात झाला. मुनमुनच्या गुडख्याला दुखापत झाली आहे.
मुनमुननं तिच्या स्वित्झर्लंड ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये ती हॉट चॉकलेटचा आस्वाद घेताना दिसली. मुनमुन ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
View this post on Instagram
मुनमुन दत्ता ही बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. ती केवळ दोन दिवसच या शोमध्ये सामिल झाली. तसेच तिच्या तारक मेहता या मालिकेतील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. दिलीप जोशी यांनी या मालिकेत जेठालाल ही भूमिका साकारली. जेठालाल आणि बबिता यांच्या जोडीला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. तारक मेहता मालिकेबरोबरच मुंबई एक्सप्रेस, हॉलिडे या चित्रपटांमध्ये देखील बबितानं महत्वाची भूमिका साकारली.
28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच या मालिकेमधील कलाकारांची विनोदी शैली नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम मुनमुन दत्ताचं स्वप्न साकार, खरेदी केले आलिशन घर; पाहा फोटो






















