एक्स्प्लोर
मुंबईतील राहत्या घरासमोरुन टीव्ही अभिनेत्रीची कार चोरीला
स्वरांगिनी, देवांशी यासारख्या हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री हेली शाहची गाडी तिच्या मिरा रोडमधील राहत्या घरासमोरुन चोरीला गेली

मिरा रोड : मिरा रोडमध्ये राहणाऱ्या एका अभिनेत्रीची कार तिच्याच घरासमोरुन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या हेली शाह या अभिनेत्रीची कार चोरीला गेली. कारचोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिरा रोडमधील पूनम गार्डन परिसरातल्या सेरेनिटी इमारतीत अभिनेत्री हेली शाह राहते. आपली गाडी सोसायटीच्या बाहेर सॉलिटेअर इमारतीच्या समोरील रोडवर पार्क करते. सकाळी देवांशी मालिकेच्या शूटींगला जाताना हेलीला आपली गाडी जागेवर आढळली नाही. हेली शाहने मिरा रोड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने चोरांचा तपास करत आहेत. बुधवारी पहाटे तीन-सवातीन वाजताच्या सुमारास तिघा इसमांनी कार चोरुन नेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसलं. हेली शाहने देवांशी, स्वरांगिनी यासारख्या जवळपास सहा हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.
आणखी वाचा























