(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suraj Chavan : 14 लाखांचा चेक, 10 लाखांचे व्हाऊचर, बाईक अन्ं बरंच काही; 'बिग बॉस' जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
Suraj Chavan Bigg Boss Winner : ज्याला गेम समजत नाही अशी टीका होत असताना शेवटी सूरज चव्हाण विजेता ठरला आणि त्याला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली.
मुंबई : गेल्या 70 दिवसांपासून बिग बॉसच्या घरात रंगलेला खेळ संपला असून सगळ्यांना बुक्कीत टेंगूळ देऊन बारामतीचा सूरज चव्हाण विजेता ठरला. गायक असलेला अभिजीत सावंत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ज्याला गेम कळत नाही अशी टीका होत असलेल्या सूरज चव्हाणने त्याची पॉवर दाखवली आणि बिग बॉस जिंकत बक्कळ कमाई केली. सूरज चव्हाणवर आता बक्षीसांचा वर्षाव झाला असून एका क्षणात तो लखपती झाला. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केली.
बारामतीमधील सूरज चव्हाण हा बिग बॉस मध्ये येण्यास उत्सुक नव्हता, पण बिग बॉसच्या टीमने शेवटी त्याला घरामध्ये आणले. त्यानंतरही सूरज चव्हाण अडखळताना दिसला. सूरज चव्हाणला गेम समजत नाही अशी टीकाही त्याच्यावर होत होती. पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या पाठिंब्यावर सूरज चव्हाणने अखेर बिग बॉसच्या पाचव्या सीजनच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.
How Much Money Got Suraj Chavan : सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
बिग बॉसचा अंतिम विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून 14 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले. तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.
अभिजीत सावंतला किती रुपये मिळाले?
बिग बॉस मराठीचा रनर अप अभिजीत सावंतला पु. ना. गाडगीळ यांच्याकडून एक लाख रुपयांचा चेक देण्यात आला. तसेच इतर स्पर्धक असलेले धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले.
How Much Money Got Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरला 9 लाख रुपयांचे बक्षीस
या स्पर्धेतील टास्क क्वीन अशी ओळख असलेल्या जान्हवी किल्लेकरने मात्र इतरांच्या तुलनेत चांगले पैसे कमावले. पहिल्या सहा स्पर्धकांमध्ये असलेल्या जान्हवीने अंतिम स्पर्धा सुरू व्हायच्या आधी पैसे घेऊन बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये तिला तब्बल 9 लाख रुपये मिळाले. जान्हवी ही सहाव्या क्रमांकावर राहिली होती, त्यामुळे तिने पैसे घेण्याचा निर्णय तिच्यासाठी योग्य ठरला.
View this post on Instagram
ही बातमी वाचा: