Star Pravah : 'स्टार प्रवाह'वर होणार दोन नव्या सदस्यांची एन्ट्री, 'हा' अभिनेता पुन्हा एकदा वाहिनीवर झळकणार?
Star Pravah New Actor : स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच दोन नव्या सदस्यांची एन्ट्री होणार आहे. तसेच हे दोन सदस्य कोण असणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
Star Pravah New Actor : सध्या 'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवर नव्या मालिकांची सुरुवात होणार आहे. त्याचमुळे अनेक नवे सदस्य देखील स्टार प्रवाहच्या परिवारामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावरील (Social Media) एका पोस्टमुळे स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची घोषणा केली होती. त्यामुळे येत्या काळात स्टार प्रवाह वाहिनीवर बरेच बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
स्टार प्रवाहकडून फोटे शेअर करत प्रेक्षकांना दोन नव्या कमाल सदस्यांच्या स्वागतासाठी तयार होण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं आहे. पण या मालिकेत इतर कलाकार मंडळी कोण असणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. तसेच हे दोन सदस्य सध्या सुरु असलेल्या मालिकांमध्ये झळकणार की नव्या मालिकांमध्ये हे सदस्य पाहायला मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. काही दिवसांपूर्वी 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत हार्दीक जोशीने पुन्हा दमदार एन्ट्री घेतली आहे. तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील पश्या म्हणजेच आकाश नलावडे असल्याचा अंदाज प्रेक्षक लावत आहे.
प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, 'आपल्या स्टार प्रवाह परिवारात सामील होणारे हे 2 नवीन सदस्य कोण हे जाणून घेण्यासाठी बघत राहा स्टार प्रवाह,' असं कॅप्शन लिहिलं आहे. तसेच त्यांनी अभिनेत्यांचे फोटो शेअर केलेत पण त्यांचे फोटो ब्लर केलेत. 'या फोटोला त्यांनी,तयार व्हा आपल्या स्टार प्रवाह परिवात 2 कमाल सदस्यांचा स्वागतासाठी,' असं कॅप्शन लिहिलं आहे. स्टार प्रवाहच्या पोस्टमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
आई कुठे काय करते घेणार प्रेक्षकांचा निरोप?
'आई कुठं काय करते' या मालिकेच्या वेळेत स्टार प्रवाहवर नवी मालिका सुरू होणार आहे. घरोघरी मातीच्या चुली ही नवी मालिका सुरू होत आहे. पुढील महिन्यात 18 मार्चपासून ही मालिका सोमवार ते शनिवार दरम्यान संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे आता 'आई कुठं काय करते' ही मालिका बंद होणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत
नव्याने सुरू होणाऱ्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत जानकी हे महत्त्वाचं पात्र रेश्मा शिंदे साकारणार आहे. ‘रंग माझा वेगळा' या मालिके रेश्माची मुख्य भूमिका होती. ही मालिका कौटुंबिक जिव्हाळा, नातेसंबंधावर भाष्य करणारी असणार आहे.