Shubhangi Gokhale : अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे फेसबुक अकाऊंट हॅक
शुभांगी गोखलेंचे नुकतेच फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. त्यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
Shubhangi Gokhale : अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. त्यासंदर्भात शुभांगी गोखलेंनी स्वत: माहिती दिली आहे. शुभांगी गोखलेंनी सोशल मीडियावर लिहिले आहे,"पुन्हा एकदा माझे अकाऊंट हॅक झाले आहे. माझ्या नकळत सर्वांना मेसेजमध्ये एक लिंक जात आहे. कृपया ती लिंक ओपन करू नका. माझे सायबर सेलसोबत बोलणं सुरू आहे".
शुभांगी गोखलेंनी पुढे लिहिले आहे,"हा मेसेज गेले अनेक दिवस फेसबुक मेसेंजरवर फिरतोय. कृपया कोणी तुम्हाला ही लिंक पाठवली तर ओपन करू नका. ओपन केलीत तर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना मेसेज जातील. ही एक व्हायरल लिंक आहे. तुम्ही जर क्लिक केलं तर ही लिंक तुम्हाला फेक युट्यूबसारख्या दिसणाऱ्या साईटवर घेऊन जाते. जिथे मेसेंजर सारखचं पेज दिसतं. तिथे लॉग इन केल्याशिवाय व्हिडीओ दिसणार नाही, असं सांगितलं जातं. हा ट्रॅप आहे. यात अडकू नका".
शुभांगी गोखलेंच्या अकाऊंटमधून अनेकांना मेसेज जात आहेत. या मेसेजमध्ये एक लिंक असून तुझे अश्लील फोटोज या लिंकवर आहेत, असा मेसेज जात आहे. यासंदर्भात शुभांगी गोखले यांनी सायबर सेलचे प्रमुख रश्मी करंदीकर यांना तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
छोट्या पडद्यावरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अशातच या मालिकेतील सर्वांची लाडकी शकू मावशी अर्थात शुभांगी गोखले मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. मालिकेत आता शुभांगी गोखलेंच्या जागी किशोरी अंबीये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या
Antim : सलमानच्या चाहत्यांचा तुफान राडा... मालेगावमध्ये थिएटरमध्येच लावली फटाक्यांची माळ
Marathi Natak : 'धनंजय माने इथंच राहतात' लवकरच रंगभूमीवर
John Abraham आणि Salman Khan आमने-सामने, बॉक्स ऑफिसवर 'अंतिम' सिनेमाची दमदार कमाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha