एक्स्प्लोर

Antim : सलमानच्या चाहत्यांचा तुफान राडा... मालेगावमध्ये थिएटरमध्येच लावली फटाक्यांची माळ

Salman Khan : मालेगावच्या सुभाष चित्रपटगृहात अंतिम सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दरम्यान चाहत्यांनी चित्रपटगृहात गोंधळ घालत फटाक्यांची आतिषबाजी केली आहे.

Antim: The Final Truth : सलमान खानचा (Salman Khan) 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमा देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकत आहे. प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन सुपरस्टार सलमानचा 'अंतिम' सिनेमा बघत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानच्या कामाचे कौतुकदेखील करत आहेत. अशातच काल मालेगावच्या सुभाष चित्रपटगृहात अंतिम सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दरम्यान चाहत्यांनी चित्रपटगृहात गोंधळ घालत फटाक्यांची आतिषबाजी केली आहे. 

सलमान खानचा अंतिम सिनेमा काल मालेगावच्या सुभाष चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. दरम्यान शेवटच्या शो दरम्यान सलमानच्या चाहत्यांनी रात्री चित्रपटगृहात गोंधळ घालत फटाक्यांची आतिषबाजी केली. या संपूर्ण प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. या प्रकरणी छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेले आहे. काही महिन्यांपूर्वी जॉन अब्राहमचा मुंबई सागा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यावेळीदेखील अशाच प्रकारची हुल्लडबाजी होऊन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. 

फटाक्यांच्या आतिषबाजीवर सलमान खानने चाहत्यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून विनंती केली आहे,"सिनेमागृहात फटाके घेऊन जाऊ नका. आगीमुळे तुमच्यासह इतरांचादेखील जीव धोक्यात येऊ शकतो. माझी थिएटर मालकांना विनंती आहे, फटाके सिनेमागृहात नेण्यास परवानगी देऊ नये. सिनेमाचा आनंद घ्या. पण सिनेमागृहात फटाक्यांची आतिषबाजी करणं कृपया टाळा".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अंतिम : द फायनल ट्रुथ' हा सिनेमा 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'अंतिम' सिनेमात सलमान खान एका शूर पोलिसाच्या भूमिकेत दिसतो आहे. तर सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा गुंडाच्या भूमिकेत दिसतो आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महिमा मकवानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget