एक्स्प्लोर

Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी' गाजवण्याआधी शिव ठाकरेने आईच्या आठवणींना दिला उजाळा; म्हणाला,"ती मला भेटायला येणाऱ्यांना ट्रान्सपोर्ट टेम्पोमध्ये खायला द्यायची"

Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) गाजवण्यासाठी शिव ठाकरे सज्ज झाला आहे.

Shiv Thakare In Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) गाजवण्यासाठी शिव ठाकरे (Shiv Thakare) सज्ज झाला आहे. 'बिग बॉस मराठी'चा विजेता आणि 'बिग बॉस 16'चा पहिला रनर-अप शिव ठाकरेने (Shiv Thakare) आता 'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होण्याआधी आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

शिव ठाकरे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आसपासच्या लोकांसोबत बोलताना, त्यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसून येतो. याला कारण त्याची आई आहे. याबद्दल स्पष्टीकरण देत शिव ठाकरे म्हणाला की,"बिग बॉस 16 जिंकल्यानंतर मी घरी आलो तेव्हा महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक मला भेटायला यायचे आणि माझी आई त्यांना थांबून जेवून जाण्याचा आग्रह करायची".

शिव ठाकरे पुढे म्हणाला,"आमचं घर लहान होतं, ते माणसांनी भरलं होतं आणि त्यांना बसायला आणि खायला जागा नव्हती. पण माझ्या आईला सलाम की तिने खास टेम्पोची व्यवस्था केली होत आणि त्यांना त्यात बसून जेवायला लावलं. या सर्वांसाठी तिने स्वत: स्वयंपाक केला होता. जेव्हा मी तिला विचारले की, तू हे सर्व का करत आहेस? त्यावेळी ती म्हणाली की,"ज्यांनी नेहमीच तुला पाठिंबा दिला त्यांना कधीही विसरु नको आणि त्यांच्यासाठी योग्य वेळ काढत राहा". 

आईबद्दल बोलताना शिव ठाकरे म्हणाला की,"माझ्या आईने मला नेहमीच मोठी स्वप्नं पाहायला शिकवले आहे. त्यासाठी कठोर परिश्रम करायलादेखील सांगितलं आहे. फक्त लढ घाबरू नको, असा सल्ला आईने मला दिला आहे". 

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेने एमटीव्हीच्या 'रोडीज रायझिंग सीझन 14'मध्ये देखील भाग घेतला होता.  अमरावती येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शिव एक इंजिनियर आहे. 2019 मध्ये मराठी टेलिव्हिजनवर टाइम्स ऑफ इंडियाच्या टॉप 15 मोस्ट डिझायरेबल पुरुषांमध्ये तो पहिल्या क्रमांकावर होता. 

शिव ठाकरे सध्या दक्षिण आफ्रिकेतील 'खतरों के खिलाडी 13'चं शूटिंग करत आहेत. शिव ठाकरेने मराठी आणि हिंदी बिग बॉस चांगलच गाजवलं आहे. आता रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13'च्या (Khatron Ke Khiladi 13) माध्यमातून तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. शिवला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत. 'खतरों के खिलाडी 13'मध्ये शिव ठाकरे उंचावरुन लटकताना, साप-मगरी यांच्यामध्ये स्टंटबाजी करताना दिसत आहे. या खेळासाठी तो खूप उत्सुक आहे. 

संबंधित बातम्या

Shiv Thakare : आईचा आशीर्वाद घेऊन 'खतरों के खिलाडी' गाजवायला शिव ठाकरे सज्ज; व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
ॲड. प्रकाश आंबेडकर करणार आज मोठी घोषणा! ट्वीट करत दिली माहिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ॲड. प्रकाश आंबेडकर करणार आज मोठी घोषणा! ट्वीट करत दिली माहिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Kiran Mane : 'कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप चार वेद आणि 18 पुराणांपेक्षा लै मोठ्ठा'; आषाढी वारीनिमित्त किरण मानेंची पोस्ट
'कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप चार वेद आणि 18 पुराणांपेक्षा लै मोठ्ठा'; आषाढी वारीनिमित्त किरण मानेंची पोस्ट
CM Tirth Darshan Yojana: ही रेवडी  नाही का? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या विरोधात ओवेसी मैदानात, शिंदे सरकारला परखड सवाल
ही रेवडी नाही का? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या विरोधात ओवेसी मैदानात, शिंदे सरकारला परखड सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट Top 50 News ABP MajhaPooja Khedkar on Washim Police | वाशिम पोलिसांनी कसलीही चौकशी केली नाही, पूजा खेडकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 12 PM : 16 Jully 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सWarkari Accident : Kalyan : पंढरीकडे निघालेल्या कल्याणमधील वारकऱ्यांच्या बसवर काळाचा घाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
ॲड. प्रकाश आंबेडकर करणार आज मोठी घोषणा! ट्वीट करत दिली माहिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ॲड. प्रकाश आंबेडकर करणार आज मोठी घोषणा! ट्वीट करत दिली माहिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Kiran Mane : 'कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप चार वेद आणि 18 पुराणांपेक्षा लै मोठ्ठा'; आषाढी वारीनिमित्त किरण मानेंची पोस्ट
'कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप चार वेद आणि 18 पुराणांपेक्षा लै मोठ्ठा'; आषाढी वारीनिमित्त किरण मानेंची पोस्ट
CM Tirth Darshan Yojana: ही रेवडी  नाही का? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या विरोधात ओवेसी मैदानात, शिंदे सरकारला परखड सवाल
ही रेवडी नाही का? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या विरोधात ओवेसी मैदानात, शिंदे सरकारला परखड सवाल
मोठी बातमी!  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
मोठी बातमी! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'
विशाळगड हिंसाचारप्रकरणी MIM आक्रमक, राज्यभरातील कार्यकर्त्यांसह धडकणार कोल्हापूरात, इम्तियाज जलील यांच्या सूचना
विशाळगड हिंसाचारप्रकरणी MIM आक्रमक, राज्यभरातील कार्यकर्त्यांसह धडकणार कोल्हापूरात, इम्तियाज जलील यांच्या सूचना
Sunetra Pawar  at Modibaug: सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
सुनेत्रा पवार मोदीबागेत कशासाठी गेल्या होत्या? शरद पवारांना भेटल्या का? अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण
Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
Embed widget