Bigg Boss 16 : कॅप्टनसी टास्कदम्यान Shiv Thakare आणि Nimrit Kaur मध्ये जोरदार भांडण; अभिनेत्रीला एंग्जायटीचा त्रास
Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'च्या आगामी भागात शिव ठाकरे आणि निमरित कौरमध्ये भांडण झालेलं दिसणार आहे.
![Bigg Boss 16 : कॅप्टनसी टास्कदम्यान Shiv Thakare आणि Nimrit Kaur मध्ये जोरदार भांडण; अभिनेत्रीला एंग्जायटीचा त्रास Shiv Thakare and Nimrit Kaur clashed during the captaincy task The actress suffers from anxiety Bigg Boss 16 : कॅप्टनसी टास्कदम्यान Shiv Thakare आणि Nimrit Kaur मध्ये जोरदार भांडण; अभिनेत्रीला एंग्जायटीचा त्रास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/43a65fe5a07379256f2a6efe079726311665986132123254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss 16 New Promo : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा कार्यक्रम दोन आठवड्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घरातील सदस्यांच्या नाट्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. 'बिग बॉस 16'च्या आगामी भागात शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि निमरित कौरमध्ये (Nimrit Kaur) भांडण झालेलं दिसणार आहे.
प्रियंका चहर चौधरी आणि शिव ठाकरेमध्ये कॅप्टनसी कार्य रंगणार आहे. त्यामुळे घरातील इतर स्पर्धक कॅप्टनसी कार्य कसं फसेल याकडे लक्ष ठेवून आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये शिव ठाकरे आणि निमरित कौर टास्कमध्ये भांडताना दिसत आहेत.
निमरित आणि अंकितमध्ये टास्कदरम्यान भांडण झालं आहे. भांडणानंतर निमरित रडत-रडत तिच्या दुसरीकडे निघून जाताना दिसत आहे. त्यावेळी ती म्हणते,"मला एंग्जायटी त्रास आहे". यावर प्रतिक्रिया देत शिव म्हणतो आहे,"नाटकं केल्याने काहीही होणार नाही". या प्रकारामुळेच निमरित आणि शिवमध्ये भांडण होणार आहे. बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन कोण होणार हे प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
अब्दुने मान्याला चप्पलने मारलं
अब्दु रोजिक हा बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांसह प्रेक्षकांचादेखील लाडका स्पर्धक आहे. निरागसतेमुळे अब्दुने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या बिग बॉसच्या भागात अब्दु रोजिक मान्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. मस्ती-मस्तीमध्ये त्याने मान्याला थेट चप्पलने मारले आहे. पण मान्या मात्र अब्दुच्या क्यूट फाइटची मजा घेताना दिसून आली.
संबंधित बातम्या
Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'च्या मंचावर सिद्धार्थ-कियाराच्या नात्याचा उलगडा; 'वीकेंडचा वार' ठरला खास
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)