
Sanjeeda Shaikh : पुष्पातील गाण्यावर संजीदा शेखची खास पोझ, चाहत्यांकडून कौतुक
Sanjeeda Shaikh : टीव्ही अभिनेत्री संजीदा शेखने पुष्पा चित्रपटातील 'ऊ अंतवा' या सुपरहिट गाण्यावर पोझ देत असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Sanjeeda Shaikh : टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख ही इंडस्ट्रीमध्ये तिच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती रोज तिचे नव-नवीन व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहतेही तिचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतात. संजीदाचा आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. नेहमीप्रमाणे या व्हिडीओचेही चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
संजीदाने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये ती पुष्पा चित्रपटातील 'ऊ अंतवा' या सुपरहिट गाण्यावर पोझ देत आहे. यावेळी तिने साइड स्लिट ब्लॅक गाऊन घातला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही वेळातच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांनी कमेंट्सद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याआधीही संजीदाने 'पुष्पा'च्या गाण्याचा असाच एक व्हिडीओ शेअर केला होता.
संजीदा शेखचे इन्स्टाग्रामवर 44 लाख फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधत असते. यामुळे तिचे चाहतेही खूप उत्साहित असून तिच्या प्रत्येक पोस्टवर लक्ष ठेवून असतात.
View this post on Instagram
संजीदा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सध्या ती पंजाबी चित्रपट 'मैं ते बापू'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती पंजाबी अभिनेता आणि गायक परमीश वर्मासोबत दिसणार आहे. संजीदाचा हा चित्रपट यावर्षी 22 एप्रिलला प्रदर्शित होत आहे.
दरम्यान, संजिदा शेख आणि अभिनेता आमिर अली यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. आमिर अली आणि संजिदा हे टीव्हीवरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. मात्र, घटस्फोटाबाबत आमिर किंवा संजिदाने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई
Fighter : हृतिक-दीपिका पहिल्यांदाच एकत्र,'फायटर'च्या शूटिंगला सुरुवात
Gangubai Kathiawadi : ढोलिडानंतर गंगूबाई काठियावाडीमधील 'झूमे रे गोरी'गाणं रिलीज ; आलियाच्या डान्सनं वेधलं लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
