(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sa Re Ga Ma Pa L'il Champs Winner: नऊ वर्षाची जेटशेन डोहना लामा ठरली सारेगमप लिटिल चॅम्प्स सिझन-9 ची विजेती; मिळाली ट्रॉफी आणि लाखोंचं बक्षीस
सारेगमप लिटिल चॅम्प्स- 9 ची जेटशेन डोहना लामा (Jetshen Dohna lama) ही विजेती ठरली आहे. शंकर महादेवन (Shankar Mahadevan), अनु मलिक (Anu Malik) आणि निती मोहन यांनी या कार्यक्रमाचं परीक्षण केलं.
Sa Re Ga Ma Pa L'il Champs Winner: सारेगमप लिटिल चॅम्प्स सिझन-9 (Sa Re Ga Ma Pa L'il Champs) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रमाचा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला. सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवव्या सिझनची जेटशेन डोहना लामा (Jetshen Dohna lama) ही विजेती ठरली आहे. जेटशेननं आपल्या आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली. शंकर महादेवन (Shankar Mahadevan), अनु मलिक (Anu Malik) आणि निती मोहन (Neeti Mohan) यांनी सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवव्या सिझनचे परीक्षण केलं. प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहनं सारेगमपच्या-9 चं सूत्रसंचालन केलं.
गेली तीन महिने सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या-9 या शोमधील स्पर्धक त्यांच्या आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकत होते. आता या कार्यक्रमाच्या विनरची घोषणा करण्यात आली आहे. जेटशेन ही सारेगमप सीझन-9 ची विजते ठरली तर हर्ष सिकंदर- ज्ञानेश्वरी घाडगे हे पहिले आणि दुसरे रनरअप ठरले. जेटशेन डोहनाला सारेगमप सिझन-9 हा शो जिंकल्यानंतर ट्रॉफी आणि दहा लखांचे बक्षीस मिळाले.
सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या-9 चा ग्रँड फिनाले
सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या-9 च्या ग्रँड फिनालेमध्ये अनेकांनी परफॉर्म केलं. हर्ष सिकंदर, रफा यासमीन, अथर्व बक्शी, अतनु मिश्रा, जेटशेन लामा आणि ज्ञानेश्वरी घाडगे या टॉप-6 स्पर्धकांनी ग्रँड फिनालेमध्ये परफॉर्म केलं. तसेच केवळ स्पर्धकच नाही तर परीक्षका देखील ग्रँड फिनालेमध्ये गाणी गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ आणि चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी देखील सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या-9 च्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली होती.
View this post on Instagram
जेटशेन डोहनानं व्यक्त केल्या भावना
सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या-9 ची विजेती ठरल्यावर जेटशेन डोहनानं तिच्या भावना व्यक्त केल्या. एका मुलाखतीमध्ये तिनं सांगितलं, 'माझं स्वप्न पूर्ण झालं. ही स्पर्धा कठीण होती. कारण या सिझनमधील स्पर्धक खूप टॅलेंडेट होते. मी सगळ्यांचे आभार मानते.' सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक लोक जेटशेनला शुभेच्छा देत आहेत. जेटशेन ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. जवळपास 65 हजारपेक्षा जास्त नेटकरी जेटशेनला सोशल मीडियावर फॉलो करतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: