एक्स्प्लोर

Rupali Bhosle : शॉर्ट केस अन् क्लासिक लूक, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाच्या ‘त्या’ लूकचं रहस्य अखेर उलगडलं!

Rupali Bhosle : काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. रुपालीने हा लूक नेमका कशासाठी केला आहे, याची तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती.

Rupali Bhosle : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) तिच्या वेगवेगळ्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. रुपालीने हा लूक नेमका कशासाठी केला आहे, याची तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या फोटोमागचं खरं रहस्य आता समोर आलं आहे. प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यामध्ये रुपालीचा हा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे.

‘अशी ही बनवाबनवी’ या क्लासिकल चित्रपटातील ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यावर रुपाली भोसले परफॉर्म करणार आहे. याच परफॉर्मन्साठी रुपालीने अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांच्या चित्रपटातील लुकशी मिळताजुळता लूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहा व्हिडीओ :

या परफॉर्मन्ससाठी रुपाली अतिशय उत्सुक असून असा हटके प्रयोग तिने पहिल्यांदाच केला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधानसोबत रुपाली या सदाबहार गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. रुपालीचा हा हटके अंदाज ‘प्रवाह पिक्चर पुरस्कार 2022’ सोहळ्यात रविवार 16 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

रुपाली भोसलेचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. अभिनेत्रीने स्वतः या लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या परफॉर्मन्ससाठी तयार होत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तिचा हा लूक पाहून चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला होता. अनेकांना वाटलं होतं की, तिने खरंच आपले केस कापले का?, हा लूक नेमका कशासाठी?, असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला होता.

रुपालीने साकारलेल्या ‘संजना’ मिळतोय चांगला प्रतिसाद

छोट्या पडद्यावरची ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले हिने ‘संजना’ची भूमिका साकारली आहे. तर, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि अभिनेते मिलिंद गवळी ‘अरुंधती-अनिरुद्ध’ची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत रुपालीने खलनायिका साकारली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या आयुष्यात येऊन त्यांचा संसार मोडून, अनिरुद्धशी संसार थाटणारी संजना सुरुवातीला प्रेक्षकांच्या रोषाला कारणीभूत ठरली होती. मात्र, आता तिच्या या पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळते आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री आपल्या आयुष्यातील अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.   

हेही वाचा :

PHOTO: 'बिग बॉस' फेम रुपाली भोसलेनं धरला रास दांडियात ठेका

PHOTO : जरीच्या साडीत कशी सजून धजून... रुपाली भोसलेच्या सुंदर फोटोशूटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

महत्त्वाच्या बातम्या

Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget