Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंटबाजी करताना रोहित रॉय जखमी; मुंबईला रवाना होण्याची शक्यता
Rohit Roy : 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना रोहित रॉय जखमी झाला आहे.
Rohit Roy Injured Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'च्या (Khatron Ke Khiladi 13) शूटिंगला दक्षिण आफ्रिकेत सुरुवात झाली आहे. शूटिंग सुरू होताच स्टंटबाजी करताना अभिनेता रोहित रॉय (Rohit Roy) जखमी झाला आहे. त्यामुळे तो आता मुंबईला रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोहित रॉयने 'खतरों के खिलाडी 13'चं (Khatron Ke Khiladi 13) शूटिंग पूर्ण करावं, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. पण त्याची जखम बरी होण्यासाठी वेळ लागू लागतो. रोहित रॉयलादेखील हा कार्यक्रम करण्याची इच्छा आहे. पण गंभीर दुखापत झाल्याने रोहित रॉय मुंबईला येऊ शकतो.
View this post on Instagram
सुरक्षिततेबद्दल रोहित शेट्टी म्हणाला...
'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या सुरक्षिततेकडे आमचं पूर्पपणे लक्ष आहे. आता रोहित रॉय 'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होणार नसल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. रोहित रॉय नक्की कोणतं स्टंट करताना जखमी झाला, हे अद्याप समोर आलेलं नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या शर्मालादेखील स्टंट करताना दुखापत झाली होती. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती.
'खतरों के खिलाडी 13'मधील स्पर्धकांबद्दल जाणून घ्या...
'खतरों के खिलाडी 13' रोहित शेट्टी (Rohit Shetty) होस्ट करत आहे. तर या पर्वात शिव ठाकरे, डेजी शाह, ऐश्वर्या शर्मा, शिझान खान, अंजली आनंद आणि अर्चना गौतम या स्पर्धकांची खेळी पाहायला मिळणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात 'खतरों के खिलाडी 13'चं प्रसारण होणार आहे. 'खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात शिव ठाकरे आणि अब्दू रोजिकची जोडी दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
'खतरों के खिलाडी 13'बद्दल रोहित रॉय म्हणालेला...
'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होण्याबद्दल रोहित रॉय (Rohit Roy) म्हणालेला,"खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंट करताना निर्माते स्पर्धकांची खूप काळजी घेतात. स्टंटबाजी करताना मलादेखील स्वत:ची काळजी घ्यायला हवी. साहसी खेळादरम्यान सुरक्षिततेला महत्त्व द्यायला हवं".
संबंधित बातम्या