‘रामायणा’तील सीतेने 4 वर्ष साजरी केली नाही दिवाळी, अभिनेत्रीचा आश्चर्यजनक खुलासा; सांगितलं मोठं कारण
Deepika Chikhalia : छोट्या पडद्यावरील कल्ट टीव्ही मालिका रामायण आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. लहानथोर सर्वांना या मालिकेनं वेड लावलं होतं.
Ramayana TV Series : छोट्या पडद्यावरील काही मालिकांचं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान आहे. रामायण मालिका ही टीव्ही मालिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन आहे. लहानथोर सर्वांनी ही मालिका अतिशय आवडीनं पाहिली. लहानापासून मोठ्यांपर्यंत या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. आजही यातील पात्र आणि कलाकार यांची प्रेक्षकांच्या मनावर छाप कायम आहे. जेव्हा ही मालिका सुरु झाली होती, तेव्हा घरातील सर्वजण एकत्र बसून ही मालिका पाहायचे. या मालिकेनं जणू सर्वांना वेड लागलं होतं. लॉकडाऊनच्या काळात ही टीव्ही मालिका पुर्नप्रसारित करण्यात आली, त्यावेळीही याला चांगला टीआरपी मिळाला होता.
सीतामातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा खुलासा
रामायण मालिकेमध्ये प्रभू श्रीराम आणि सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना यामुळे खूप प्रसिद्धी मिळाली. रामायण मालिकेमधील सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांना यामुळे घराघरात ओळख मिळाली. दीपिका चिखलिया यांनी दिवाळी संदर्भात आश्चर्यजनक खुलासा केला. दीपिका चिखलिया यांनी मोठा खुलासा करत सांगितलं की, त्यांनी चार वर्ष दिवाळी साजरी केली नव्हती. यामागचं मोठं कारणही त्यांनी सांगितलं आहे.
चार वर्ष दिवाळी साजरी केली नव्हती
रामायण मालिकेचं शुटिंग महाराष्ट्राच्या सीमेवरील भागाता सुरु होतं. महाराष्ट्राच्या सीमेवरील उमरगाव या ठिकाणी रामायण मालिकेचं शुटींग सुरु होतं. मालिकेतील सर्व कलाकार त्यावेळी तिथेच वास्तव्यास होते. मालिकेच्या शूटींगचं लोकेशन आणि कलाकारांचं घर फार लांब असल्यामुळे शुटींगच्या लोकेशन जवळच कलाकारांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे कलाकार आणि क्रू मेंबर्स कुणालाही घरी जायला संधी मिळायची नाही. रामायण मालिकेचं शुटींग सलग चार वर्ष सुरु होतं, त्यामुळे चार वर्ष दिवाळी साजरी करता आलं नाही.
चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा
अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी चाहत्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :